एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Amazon vs MNS Case | अॅमेझॉनच्या अॅप, वेबसाईटवर लवकरच मराठीचा पर्याय, मनसेचा दावा

Amazon vs MNS Case : अॅमझॉनच्या अधिकाऱ्यांनी विविध प्लॅटफॉर्मवर लवकरच मराठी भाषेचा वापर करणार असल्याचं आश्वासन दिल्याचा दावा मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. त्यामुळे मनसेच्या खळ्ळखट्याकनंतर अॅमेझॉन बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे

मुंबई : मनसेने केलेल्या खळ्ळखट्याक आंदोलनानंतर अॅमेझॉन बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. कारण आज अॅमझॉनच्या अधिकाऱ्यांनी विविध प्लॅटफॉर्मवर लवकरच मराठी भाषेचा वापर करणार असल्याचं आश्वासन दिल्याचा दावा मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. आज मनसे नेते आणि अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली आहे.

मनसेने काल अॅमेझॉनविरोधात खळ्ळखट्याक आंदोलन केलं होतं. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई आणि पुण्यातील अॅमेझॉनच्या कार्यालयात तोडफोड केली होती. त्यानंतर अॅमेझॉन आता बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. अॅमेझॉनन काही वेळातच मराठी भाषेच्या पर्यायाबद्दल घोषणा करेल, असं ट्वीट मनसे नेते अखिल चित्रे यांनी केलं आहे.

Amazon vs MNS Case | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नोटीस, दिंडोशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

अखिल चित्रे काय म्हणाले? मनसेने केलेल्या खळ्ळखट्याक आंदोलनानंतर अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांनी मनसे नेत्यांसोबत चर्चा केली. या विषयी अखिल चित्रे यांनी सांगितलं की, "आम्हीअॅप आणि वेबसाईटवर चूज युवर ओन लॅन्ग्वेज या पर्यायात लवकरच मराठी भाषा आणत आहोत. आम्ही क्षमस्व आहोत, असं अॅमेझॉनने म्हटलं आहे. ज्याप्रकारे अॅमेझॉनने मधल्या काळात मराठी द्वेष दाखवला होता, तेव्हाच मनसेने कार्यकर्त्यांनी त्यांना सह्याद्रीचं पाणी पाजणार असा इशारा दिला होता. त्याचप्रकारे काही महाराष्ट्रात काही ठिकाणी फटाके फुटले. त्यामुळे झोपलेलं अॅमेझॉन प्रशासन खडबडून जागं झालं. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना, आमच्या सचिवांना, कामगार नेत्यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळे अॅमेझॉनने राज ठाकरेंची माफी मागावी ही आमची पहिली अट होती. आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मराठीचा समावेश करत असल्याचं त्यांनी थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर नमूद करावं. आम्हाला कागदी घोडे नाचवण्यात आणि पत्रव्यवहार करण्यात रस नाही. ते त्यांनी केलं आहे. सचिवांविरोधातील सर्व खटले मागे घेण्यात आले आहेत."

मनसे-अॅमेझॉनमधील वाद अॅमेझॉनच्या अॅपमध्ये मराठी भाषा असावी अशी मनसेचे मागणी आहे. मात्र मनसेची ही मागणी पूर्ण करण्यास अॅमेझॉनने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे मनसेने अॅमेझॉनविरोधात मोहीम सुरु करुन 'नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन' असा मजकूर असलेले फलक वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर लावले. शिवाय याआधी अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेरही मनसेने पोस्टर झळकावले होते. त्यात भर म्हणून अॅमेझॉनने ठिकठिकाणी लावलेले पोस्टर मनसे कार्यकर्त्यांनी फाडले होते. याविरोधात अॅमेझॉनने कोर्टाचं दार ठोठावलं. त्यानंतर दिंडोशी न्यायालयाने राज ठाकरे आणि सचिवांना नोटीस पाठवून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget