एक्स्प्लोर

Amazon vs MNS Case | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नोटीस, दिंडोशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Amazon vs MNS Case : मनसे आणि अॅमेझॉन यांच्यातील वाद चिघळला आहे. मुंबईतील दिंडोशी कोर्टाने राज ठाकरे यांना नोटीस बजावून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अॅमेझॉन यांच्यातील वाद चिघळला आहे. अॅमेझॉन कोर्टात गेल्यानंतर मुंबईतील दिंडोशी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाचे सचिवांना नोटीस पाठवली. या प्रकरणी 5 जानेवारील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याआधी मनसे नेते अखिल चित्रे यांना सुद्धा 19 डिसेंबरला अशा प्रकारची नोटीस पाठवण्यात आली होती.

मनसेनेच्या कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनने विविध ठिकाणी लावलेले पोस्टर फाडले होता. यामुळे अॅमेझॉनने कोर्टात धाव घेतल्याने हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसे सचिव यांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.

मनसे-अॅमेझॉनमधील वाद अॅमेझॉनच्या अॅपमध्ये मराठी भाषा असावी अशी मनसेचे मागणी आहे. मात्र मनसेची ही मागणी पूर्ण करण्यास अॅमेझॉनने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे मनसेने अॅमेझॉनविरोधात मोहीम सुरु करुन 'नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन' असा मजकूर असलेले फलक वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर लावले. शिवाय याआधी अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेरही मनसेने पोस्टर झळकावले होते. त्यात भर म्हणून अॅमेझॉनने ठिकठिकाणी लावलेले पोस्टर मनसे कार्यकर्त्यांनी फाडले होते. याविरोधात अॅमेझॉनने कोर्टाचं दार ठोठावलं. त्यानंतर दिंडोशी न्यायालयाने राज ठाकरे आणि सचिवांना नोटीस पाठवून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

राज ठाकरेंना नोटीस बजावण्याची किंमत अॅमेझॉनला मोजवी लागणार : अखिल चित्रे राज ठाकरेंना यांना पाठवलेल्या नोटीसवर मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, "मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असून अॅमेझॉनला उत्तर दिलं जाईल. महाराष्ट्रात व्यवसाय करत असल्याचं अॅमेझॉनने विसरु नये. अॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी आम्ही नक्कीच पाजणार. अॅमेझॉनने खटले दाखल करण्याचा महाराष्ट्रात प्रयोग सुरु केला आहे. याआधी 19 डिसेंबरला मलाही नोटीस पाठवली होती. अॅमेझॉनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्याचं जे दु:साहस केलं आहे त्याची किंमत येत्या दिवसात नक्कीच मोजावी लागणार आहे. अॅमेझॉनच्या वकिलांनी पाठवलेल्या नोटीसला आम्ही फारशी किंमत देत नाही. मराठीसाठी कोणत्याही प्रकारचे खटले अंगावर घेण्याची आमची तयारी आहे, हे अॅमेझॉनने लक्षात ठेवावं."

Amazon vs MNS | राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाची नोटीस; मनसे आणि अ‍ॅमेझॉनमधला वाद चिघळला

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Sahil Wakode Death Case: 'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...', आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...' आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Embed widget