एक्स्प्लोर
आयसिसशी संबंध असल्याचा संशय, जिल्हा परिषद शिक्षक ताब्यात
हिंगोली : आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून हिंगोलीतून एका जिल्हा परिषद शिक्षकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. रईसुद्दीन सिद्दीकी असं त्याचं नाव असून महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे.
हिंगोलीतील आजम कॉलनीमधून रईसुद्दीन सिद्दीकीला एटीएसने ताब्यात घेतलं. अधिक चौकशीनंतर त्याला अटक होण्याची शक्यता आहे. रईसुद्दीन सिद्दीक मूळचा परभणीचा असून तो सध्या आझम कॉलनीत राहत होता.
परभणीतून आणखी एक आयसिस संशयित ताब्यात
एटीएसने कालच परभणीतून आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन 24 वर्षीय शेख इकबाल शेख कबीर अहमद या तरुणाला एटीएसने अटक केले होती. तर त्याआधी शाहीद खान आणि नासिरबेन यांनाही बेड्या ठोकल्या होत्या. विशेष म्हणजे, शाहीद, नासिरबेन आणि शेख इकबाल शेख कबीर अहमद हे तिघेही मित्र आहेत. रईसुद्दीन सिद्दीकीचा त्यांच्या संपर्कात होता. त्यांची दिशाभूल करण्याची भूमिका रईसुद्दीनने बजावली होत. त्यानंतर रईसुद्दीनविरोधात महत्त्वाचे पुरावे हाती लागल्यानंतर एटीएसने आता त्याला ताब्यात घेतलं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement