एक्स्प्लोर
वडील आणि बहिणीवर वार करुन महिलेची आत्महत्या

सातारा : वडील आणि बहिणीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन महिलेने आत्महत्या केली. साताऱ्याच्या वाई तालुक्यातील एकसर गावात ही घटना घडली आहे. सीमा गायकवाड ही विवाहित असून ती काही दिवसांपासून वडिलांकडेच राहत आहे. सकाळी सीमा आणि तिच्या वडिलांचं काही कारणावरुन वाद झाला. त्या वादातून सीमाने वडिलांवर धारदार शस्त्राने वार केला. तिला अडवण्यासाठी बहिण हेमा कळंबे मध्ये पडली. परंतु सीमाने हेमालाही भोसकलं. त्यानंतर सीमा गायकवाडने स्वत:चा गळा कापून आत्महत्या केली. या घटनेत हेमा कळंबेचा जागीच मृत्यू झाला. तर वडील अरविंद कळंबे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























