एक्स्प्लोर
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कोणकोणत्या महापालिकेतील नगरसेवकांचं पद रद्द होणार?
कोल्हापूर महापालिकेतील 20, चंद्रपूर महापालिकेतील एक, वसई-विरार महापालिकेतील पाच, लातूर महापालिका आठ, परभणी एक आणि मुंबई महापालिकेतील पाच ते सहा नगरसेवकांचं पद रद्द होणार आहे.

मुंबई : निवडणूक होऊन सहा महिन्यांनंतरही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकांचं पद रद्द होणार आहे. कोल्हापूर महापालिकेतील 20, चंद्रपूर महापालिकेतील एक, वसई-विरार महापालिकेतील पाच, लातूर महापालिका आठ, परभणी एक आणि मुंबई महापालिकेतील पाच ते सहा नगरसेवकांचं पद रद्द होणार आहे. सुप्रीम कोर्टाने आज या संदर्भातला महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निकालानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यात त्याचा प्रभाव जाणवणार आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कौन्सिल अॅक्टच्या कलम 9 अनुसार आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर विजयी उमेदवारांना सहा महिन्यात (निवडणुकीवेळी सादर केलेलं नसल्यास) जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे. कोणकोणत्या महापालिकेतील नगरसेवकांचं पद रद्द? कोल्हापूर महापालिका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सर्वात मोठा फटका कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांना बसला आहे. विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि भाजपच्या एकूण 20 नगरसेवकांचं पद रद्द झालं आहे. कोल्हापूर महापालिकेतील पक्षीय बलाबल भाजपा - 13 ताराराणी - 19 काँग्रेस - 27 राष्ट्रवादी काँग्रेस - 15 शिवसेना - 04 अन्य - 02 या नगरसेवकांचं पद रद्द काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी
- सुभाष बुचडे (काँग्रेस)
- स्वाती येवलुजे(काँग्रेस)
- रिना कांबळे(काँग्रेस)
- शमा मुल्ला (राष्ट्रवादी काँग्रेस)
- हसीना फरास (राष्ट्रवादी काँग्रेस)
- अफजल पिरजादे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- संदिप नेजदार(काँग्रेस)
- वृषाली कदम(काँग्रेस)
- अश्विनी रामाणे(काँग्रेस)
- दिपा मगदूम(काँग्रेस)
- सचिन पाटील(राष्ट्रवादी काँग्रेस)
- कमलाकर भोपळे
- किरण शिराळे
- अश्विनी बारामते
- सविता घोरपडे
- विजयसिंह खाडे-पाटील
- मनीषा कुंभार
- निलेश देसाई
- संतोष गायकवाड
- नियाज खान
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
पुणे
महाराष्ट्र
राजकारण






















