एक्स्प्लोर

विधानपरिषद निवडणूक; भाजपमध्ये अडगळीत पडलेल्या अनेकांना पुन्हा संधी मिळण्याची आशा

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा जिंकणाऱ्या भाजपला आता विधानपरिषद निवडणुकीत तुलनेनं कमी जागांवर संधी मिळणार आहे. विधानसभेचं पक्षीय बलाबल पाहता भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांना अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली. येत्या 21 मे रोजी राज्यात 9 रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळ सदस्यपदी निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच भाजपमध्ये अडगळीत पडलेल्या अनेकांना पुन्हा संधी मिळण्याची आशा आहे. यासाठी भाजपच्या गोटात येत्या काळात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळू शकते.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीची गणितं बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा जिंकणाऱ्या भाजपला आता विधानपरिषद निवडणुकीत तुलनेनं कमी जागांवर संधी मिळणार आहे. त्यामुळे या मोजक्या रिक्त जागांवर आपली वर्णी लागावी यासाठी भाजपमधल्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक

विधानसभेचं पक्षीय बलाबल पाहता भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. तर शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेसला एक जागा सुटू शकते. यापैकी भाजपचे अरुण अडसड, स्मिता वाघ आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या जागा रिक्त होणार आहेत. तसेच चौथ्या जागेसाठी भाजप मित्रपक्ष आणि अपक्षांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपच्या चार जागांसाठी विधानसभेत पराभूत झालेले किंवा उमेदवारी न मिळालेल्या 'स्वकीय आणि परकीय' अशा दोन्ही इच्छुकांमध्ये चुरस पाहायला मिळेल.

कोणाच्या नावांची आहे चर्चा?

पंकजा मुंडे - भाजपचा आक्रमक ओबीसी चेहरा. विधानसभेत मोठ्या फरकाने पराभव झाल्यामुळे मराठवाड्यात पुन्हा ताकद देण्याचा प्रयत्न. मागील पाच वर्षे ग्रामविकास आणि महिला बाल कल्याण मंत्री म्हणून कामाचा अनुभव असल्यामुळे सरकारला कोंडीत पकडण्याची संधी.

एकनाथ खडसे - राज्यसभेवर पाठवण्याच्या चर्चेला पूर्णविराम देत, मला राज्याच्या राजकारणात रस असल्याचं खडसे यांनी स्वतः स्पष्ट केलं होतं. विरोधी पक्ष नेते पदाचा दांडगा अनुभव. राज्यातील ओबीसी नेतृत्वाची मोट बांधून संघटनात्मक बळकटीसाठी अजूनही प्रभावीपणे काम करण्याची इच्छा.

चंद्रशेखर बावनकुळे - उमेदवारी नाकारल्यामुळे तेली समाजाने विधानसभा निवडणुकीत पाठ फिरवली. नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय. माजी मंत्री म्हणून प्रशासनावर चांगली पकड. आर्थिक पाठबळ असलेला विदर्भाचा महत्वाचा नेता.

विधानपरिषद निवडणूक | कुणाला किती जागा? 9 जागांसाठी अशी आहेत आकड्यांची गणितं

हर्षवर्धन पाटील - इंदापूरमधून पराभूत झाल्यानंतर भाजपात सक्रिय राहण्यासाठी विधानपरिषदेत वर्णी. उत्तम संसदपटू आणि संसदीय कामकाजाचा गाढा अभ्यास. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी सक्षम. पश्चिम महाराष्ट्रातील मोठा चेहरा.

रणजितसिंह मोहिते पाटील - लोकसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश करून थेट शरद पवारांना शह दिला. मात्र अध्याप योग्य पुनर्वसन नाही. उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र. सोलापूर आणि आसपासच्या परिसरात चांगली संघटनात्मक बांधणी.

मुन्ना महाडिक - प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने भाजपात प्रवेश. लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर महाडिक यांच्या घरात एकही पद नाही. मात्र कोल्हापुरात कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे.

मात्र, भाजपच्या पद्धतीनुसार संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय संसदीय समितीकडे पाठवण्यात आली आहे. या जागांसाठी अनेक नावांची शिफारस राज्याच्या कोअर कमिटीकडून करण्यात आली आहे. याबाबत शिक्कामोर्तब केंद्रीय नेतृत्वाकडूनच जाणार केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Vidhan Sabha Assembly : कोकणकरांच्या मनात नेमकं कोण? काय आहेत स्थानिक गणितं #abpमाझाNorth Maharashtra Assembly : उत्तर महाराष्ट्रात जनतेचा मूड कुणाच्या दिशेने; ग्राऊंड झिरोवरुन रिपोर्टWest Vidarbha Vidhan sabha Assembly : पूर्व विदर्भातील मतदारांच्या मनात नेमकं काय?कौल कुणाला मिळणार?Maharashtra Assembly Election : निवडणुका जाहीर! कोणत्या पक्षाची राजकीय ताकद किती? सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Embed widget