एक्स्प्लोर

विधानपरिषद निवडणूक | कुणाला किती जागा? 9 जागांसाठी अशी आहेत आकड्यांची गणितं

विधानपरिषदेचे 24 एप्रिलला 8 सदस्य निवृत्त झाले. तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक होणार आहे. यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला आहे.

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या 9 जागांची निवडणूक घेण्याची मान्यता दिली आहे.  9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. लवकरच या निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम घोषित होणार आहे. विधानसभा सदस्यांच्या मतांवरून विधानपरिषदेवर सदस्य निवडून जाणार आहेत. विधानपरिषदेचे 24 एप्रिलला 8 सदस्य निवृत्त झाले. तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक होणार आहे. यामुळं  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच यामुळं सुटला आहे. विधानसभेत 288 आमदार आहेत. विधानपरिषदेत आमदार म्हणून निवडून जायला 29 मतांचा कोटा आहे. आकडेवारी पाहता महाविकास आघाडीच्या पाच तर भाजपच्या तीन जागा जवळपास निश्चित आहेत. नवव्या जागेसाठी मात्र चुरस पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडे 170 मतं आहेत. सहा जागांसाठी त्यांना 174 मतांची आवश्यकता आहे. तर भाजपकडे 105 स्वत:ची तर 6 ते 7 मित्रपक्षांची मतं असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळं महाविकास आघाडीला 5 आणि भाजपला 3 जागा निश्चित असल्या तरी नववी जागा कुणाला मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. विधानसभेच्या बहुमत चाचणीवेळी महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 169 मतं मिळाली होती. 169 विरुद्ध 0 असं बहुमत सिद्ध झालं होतं. मात्र विधानपरिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीनं होणार आहे. तसेच स्वत: मुख्यमंत्री मैदानात असल्यानं हा सामना रंगतदार असणार आहे. दुसरीकडे कोरोनासारख्या काळात ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा देखील आहे. महाविकासआघाडीने सहावा उमेदवार रिंगणात उतरवला तर निवडणूक नक्कीच रंगतदार होईल. पण मुख्यमंत्री स्वतः निवडणुकीच्या रिंगणात असताना हा धोका आघाडी पत्करण्याची शक्यता नाही व निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना संपत्ती जाहीर करावी लागणार  राजपाल नियुक्त सदस्यांना (affidavit) प्रतिज्ञापत्र सादर करावं लागत नाही कारण हे सदस्य नामनियुक्त असतात. राज्यपाल त्यांची थेट नेमणूक करतात. त्यांना कुठल्याही निवडणुकीला सामोरं जावं लागतं नसल्याने निवडणूक आयोगाचे मॅन्युअल त्यांना लागू होत नाही. पण आता रिक्त जागेवरुन निवडून येण्यासाठी उद्धव ठाकरे यांना (affidavit) सादर करावं लागेल. यामुळे पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना संपत्ती जाहीर करावी लागणार आहे. महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक राज्यातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.  केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक आज झाली. या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान  कोरोनाबाबतचे सगळे निर्बंध पाळण्याचं तसंच सुरक्षित निवडणूक घेण्याचं असं आयोगानं म्हटलं आहे. विधानपरिषदेचे 24 एप्रिलला 8 सदस्य निवृत्त झाले. तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त झाले तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणे आवश्यक आहे. कोरोना संकटानंतर या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने काल राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागा भरण्याची विनंती केली होती. विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र दरम्यान आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जात भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव अजॉय मेहता, स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते.  काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती भारतीय निवडणूक आयोगाला केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभागृह सदस्यत्वाचा पेच सुटणार? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा राज्यपालांनंतर महाविकासघाडीतील तीन महत्वाचे घटक असलेले शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाने देखील एक सहा पानांचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले होते. कोरोनाने निर्माण केलेली परिस्थिती मान्य आहे, पण काही काळजी घेवून निवडणूक घेणे शक्य करावे अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Vasai News: वसईतील 'त्या' भयानक महापुराचा धडकी भरवणारा पुरावा; तब्बल 12 दिवसांनी नाल्यातून बाहेर काढली कार, अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
वसईतील 'त्या' भयानक महापुराचा धडकी भरवणारा पुरावा; तब्बल 12 दिवसांनी नाल्यातून बाहेर काढली कार, अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut: विनायक राऊतांना अटक करा, आमच्या मुलीचा गैरफायदा घेतला; गिरीजाच्या आईची मागणी, नेमकं काय म्हणाल्या?
विनायक राऊतांना अटक करा, आमच्या मुलीचा गैरफायदा घेतला; गिरीजाच्या आईची मागणी, नेमकं काय म्हणाल्या?
Maharashtra State Commission for Women: महिला आयोगाला बळकटी देण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका; सुधारित आकृतीबंधाला मंजुरी, आवश्यक निधी उपलब्ध
महिला आयोगाला बळकटी देण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका; सुधारित आकृतीबंधाला मंजुरी, आवश्यक निधी उपलब्ध
Who is Gitesh Raut: ठाकरे गटाचे मुंबईतील नगरसेवक 'गितेश विनायक राऊत' कोण? पत्नीने केले कौटुंबिक छळ अन् अघोरी पूजेचे गंभीर आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
ठाकरे गटाचे मुंबईतील नगरसेवक 'गितेश विनायक राऊत' कोण? पत्नीने केले कौटुंबिक छळ अन् अघोरी पूजेचे गंभीर आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Embed widget