एक्स्प्लोर
पुण्यात व्हॅन पेटल्याने चालकाचा होरपळून मृत्यू
पुणे: धावत्या ओमनी कारने अचानक पेट घेतल्याने कार चालकाचा होरपळून मृत्यू झाला. हडपसर इथल्या ग्लायडिंग सेंटरजवळ सकाळी साड सहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
अजित आत्माराम इंगळे असं मृत चालकाचं नाव आहे.
सासवड रस्त्यावर प्राची हॅाटेलसमोर अजितची गाडी बंद पडली होती. यावेळी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करावयाची होती. त्यामुळे अजितला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्यामुळे पुण्याच्या दिशेला असणारी गाडी त्याने उतार असल्याने सासवडच्या बाजूने ढकलत नेली. त्यानंतर तो गाडीत बसला. यावेळी अचानक गाडीने पेट घेतला.
मित्राकडे जायचे असल्याने त्याने दुसऱ्या व्यक्तीची गाडी आणली होती. गॅसवर चालणारी गाडी असल्याने तीने पेट घेतला असावा असा अंदाज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement