एक्स्प्लोर
उद्धव ठाकरे आणि नारायण राणे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर!
मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे चक्क एका व्यासपीठावर येणार आहेत. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण भूमीपूजन कार्यक्रमानिमित्त दोघे एकाच व्यासपीठावर असतील.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे 23 जूनला भूमीपूजनचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थीत असतील.
राजशिष्टाचारानुसार जिल्ह्यातील स्थानिक आमदार म्हणून नितेश राणे आणि विधान परिषद आमदार नारायण राणे यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. त्यामुळे नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे.
नारायण राणे शिवसेना सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत व्यासपीठावर येण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement