एक्स्प्लोर
पिंपरीत भंगार दुकानांना भीषण आग, सोलापुरात भर रस्त्यात कंटेनर पेटला
पिंपरीत आज एका भंगारच्या दुकानाला भीषण आग लागल्याने, मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे नळदुर्ग-उमरगा रोडवरल कंटेनरनं अचानक पेट घेतल्यानं, रोडवरील वाहतूक काहीकाळ बंद करण्यात आली होती.
पिंपरी/ सोलापूर : पिंपरीत आज एका भंगारच्या दुकानाला भीषण आग लागल्याने, मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे नळदुर्ग-उमरगा रोडवरल कंटेनरनं अचानक पेट घेतल्यानं, रोडवरील वाहतूक काहीकाळ बंद करण्यात आली होती.
आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पिंपरीतील कुदळवाडीत भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नसलं, तरी मोठं नुकसान झालं आहे. या आगीने परिसरातील 8 ते 10 दुकानं जळून खाक झाली आहेत.
तब्बल अडीच तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. पण यामुळे येथील नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
दुसरीकडे सोलापुरातील नळदुर्ग-उमरगा रस्त्यावर चालत्या कंटेनरनं अचानक पेट घेतला. कंटेनरमध्ये मुंबईहून हैदराबादला रासायनिक पदार्थ घेऊन जात होता. पण रासायनिक पदार्थांनी अचानक पेट घेतल्यानं भररस्त्यात कंटनेर जळून खाक झाला.
या घटनेनंतर काहीकाळासाठी नळदुर्ग-उमरगा रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती.
संबंधित बातम्या
भिवंडीत रहिवासी इमारतीला आग, 10 जणांची सुखरुप सुटका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement