पुलवामा हल्ल्यात थोडक्यात बचावलेल्या जवानाचा साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय
लग्नासाठी सुट्टी मिळावी यासाठी ठका यांनी अर्ज केला होता. मात्र त्यांची सुट्टी सुरुवातीला नाकारण्यात आली. त्यामुळे ठका देखील इतर जवानांसोबत जम्मू-काश्मीरकडे जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्यातील बसमधून निघणार होते. मात्र ऐनवेळी ठका यांना सुट्टी मंजूर झाल्याने ते बसमधून उतरुन अहमदनगरकडे यायला निघाले. दुर्दैवाने त्याच बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.
अहमदनगर : लग्नाचा आनंद साजरा करावा की सीआरपीएफमधील 40 सहकारी शहीद झाल्याचं दु:ख व्यक्त करावं, अशा मन:स्थितीत ठका बेलकर हे आहेत. मात्र परिस्थितीची जाणीव ठेवत ठका बेलकर यांनी साधेपणानं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ठका बेलकरही पुलवामा येथे हल्ला झालेल्या बसमधून जाणार होते, मात्र सुट्टी मंजूर झाल्याने ते बसमधून उतरुन अहमदनगरला यायला निघाले.
जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. मात्र या हल्ल्यात ठका बेलकर थोडक्यात बचावले. ठका बेलकर हे मूळचे अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील गजरे झाप या गावातील रहिवासी आहेत. गेल्या 4 वर्षांपासून ठका लष्करी सेवेत आहेत. येत्या 24 तारखेला ठका यांचे लग्न होणार आहे.
लग्नासाठी सुट्टी मिळावी यासाठी ठका यांनी अर्ज केला होता. मात्र त्यांची सुट्टी सुरुवातीला नाकारण्यात आली. त्यामुळे ठका देखील इतर जवानांसोबत जम्मू-काश्मीरकडे जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्यातील बसमधून निघणार होते. मात्र ऐनवेळी ठका यांना सुट्टी मंजूर झाल्याने ते बसमधून उतरुन अहमदनगरकडे यायला निघाले. दुर्दैवाने त्याच बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.
या दहशतवादी हल्ल्यात ठका थोडक्यात बचावले असले तरी त्यांच्या कुटुंबीयांवरही दु:खाचं सावट पसरलं आहे. या हल्ल्याचा ठका बेलकर यांनाही मानसिक धक्का बसला आहे. 24 फेब्रुवारीला ठका यांचं लग्न आहे, मात्र घरात कुठल्याही प्रकारचं आनंदाचं वातावरण नाही. तसेच लग्न अगदी साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय ठका यांच्या वडिलांनी घेतला आहे. या हल्ल्याचा धक्का ठका बेलकर यांनाही बसला आहे.पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद
पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
संबधित बातम्या Pulwama terror attack : ना विसरणार, ना माफ करणार; पुलवामा हल्ल्यानंतर सीआरपीएफचं ट्वीट Pulwama terror attack : 'त्या' शहीद जवानाची कॅन्सरग्रस्त आई अजूनही आपल्या मुलाची वाट पाहतेय Pulwama terror attack : पत्नीला दोन महिन्यात परत येतो म्हणाला अन्... Pulwama terror attack : देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आलं : शरद पवार Pulwama terror attack : सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यावर विकी कौशल म्हणतो... Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा! Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी