Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 11 जून 2021 | शुक्रवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. मुंबईतील सायनच्या गांधी मार्केटमध्ये पाणी साचण्यास सुरुवात, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट
2. पुढील काही दिवस भारतातील पूर्व, मध्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, कोकणात पावसाची दमदार बॅटिंग, आयएमडीचा अंदाज
3. बुलढाण्यात जोरदार पाऊस, काच नदीला पूर आल्यामुळं वाहतूक जवळपास दोन तासांसाठी पूर्णपणे ठप्प
4. मुंबईतल्या दहिसरमध्ये गुरुवारी चार घरं कोसळली, 26 वर्षीय मुलाचा मृत्यू, जखमींवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु
5. तीन लाखांपर्यंत पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार, राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब
6. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीनंतर राजकीय वावड्या उठत असल्या तरीही राज्यातील सरकार 5 वर्षे टीकेल, शरद पवारांचं लक्षवेधी वक्तव्य
7. मराठा आरक्षण मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती आज दुपारी उदयनराजेंच्या भेटीला, दोन्ही राजेंच्या भेटीकडे मराठा समाजासह सर्वांचंच लक्ष
8. नवी मुंबईतील विमानतळाला बाळासाहेबांचंच नाव, दि.बा. पाटील यांचं नाव एखाद्या मोठ्या प्रकल्पाला देऊ, एकनाथ शिंदेंचं आश्वासन
9. राज्यातील 2 लाख पोलिसांना मिळणार हक्काची घरं, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत प्रस्तावाला मंजुरी
10. मुंबईत 10 ड्रग्ज तस्करांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई, कॉलसेंटरही चालवलं जात असल्याची माहिती तपासातून उघड