एक्स्प्लोर
घासून नाय, ठासून येणार, 'सामना'तून शिवसेनेची डरकाळी

मुंबई : राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांमध्ये घासून नाही, तर ठासून येणार, असं म्हणत शिवसेनेने 'सामना'तून विजयाचा विश्वास दाखवला आहे. इतर महापालिकांसोबत मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी सर्वात प्रतिष्ठेची असेल. भाजप आणि शिवसेनेची इथे थेट टक्कर होणार आहे. पण शिवसेनेने निकालाअगोदरच भाजपवर 'सामना'तून वार केला आहे. घासून नाय, ठासून येणार : शिवसेना
''मुंबई, ठाणे, उल्हासनगरसह राज्यातील १० महानगरपालिकांचा निकाल गुरुवारी लागणार आहे. या महानगरपालिकांसह २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांसाठी मतदारांनी मंगळवारी रेकॉर्ड ब्रेक मतदान केल्याने राजकीय पंडितांची आकडेमोड आणि सट्टेबाजांचा आकडा जोरात लागला आहे. सत्ता कुणाची, कौल कुणाला याची चर्चा चांद्यापासून बांद्यापर्यंत सुरू झाली असून सर्वांचेच लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. पण मतदारराजा आणि शिवसैनिकांना जबरदस्त विश्वास आहे, घासून नाय… ठासून येणार… शिवसेनेचा भगवाच फडकणार.''
आणखी वाचा























