एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चालकाला चक्कर आल्याने एसटी शेतात घुसली, 43 प्रवासी जखमी
राजाळे गावाजवळ आल्यानंतर एसटी चालकाला चक्कर आली. त्यामुळे त्याचा पाय एक्सलेटरवर दाबला गेला आणि बस शेतात घुसली.
सातारा : एसटी चालकाला चक्कर आल्यामुळे बस शेतात घुसल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. या अपघातात बसमधील 43 प्रवाशांना दुखापत झाली असून पाच जण गंभीर जखमी आहेत. बस शेतात जवळपास 50 फूट आत घुसली.
साताऱ्यातील फलटण तालुक्यातल्या राजाळी गावाजवळ हा अपघात घडला. राजाळे गावाजवळ आल्यानंतर एसटी चालकाला चक्कर आली. त्यामुळे त्याचा पाय एक्सलेटरवर दाबला गेला आणि बस शेतात घुसली. पन्नास फुटावर गेल्यानंतर एसटी उलटली.
या प्रकारामुळे एसटीत असलेले 43 प्रवासी चांगलेच भयभीत झाले होते. एसटी उलटल्यानंतर एसटी चालक-वाहकासह 43 जणांना चांगलाच मार लागला. यातील पाच प्रवासी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी फलटण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं.
एसटी शेतातून जात असताना बसच्या वेगामुळे चक्क काही झाडे तोडली गेली. यामध्ये चार नारळाच्या झाडांचाही समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement