Ashadhi Wari 2022 : राष्ट्रसंत तुकडोजींच्या पादुकांचा लोकरथातून प्रवास; आज बुलडाण्यात मुक्काम
Ashadhi Wari 2022 : पंढरीची वारी ही एक महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणून ओळखली जाते.
Ashadhi Wari 2022 : पंढरीची वारी ही एक महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणून ओळखली जाते. वैराग्यमूर्ती गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही वारीला जायचे. पण देवळातल्या दर्शनासाठी नव्हे तर चंद्रभागा वाळवंटतिरी जत्रेत होणाऱ्या घाणेची साफसफाई करण्यासाठी. कै.महादेवदादा गाडेकर हे गुरुदेव परंपरेतल्या तुकडोजी महाराजांचे शिष्य होते. तुकडोजी महाराजांना पाद्यपूजा मान्य नसे. मात्र, महादेवांनी भक्तीपोटी त्यांच्या पादुका पाटसूलला ठेऊन घेतल्या. नंतर महाराजांचे कर्करोगाने निधन झाले. पण त्यानंतर पंढरपूरला पादुकांची वारी सुरुच राहिली.
पिढ्यान् पिढ्या चालत आलेला हा वारसा उध्दवदादा यांचे सुपुत्र शिवदास महाराज यांनी चालूच ठेवली. त्यानिमित्ताने राष्ट्रसंतांच्या पादुकांचा भावस्पर्श आज बुलडाणा नगरीला झाला. रविकांत तुपकर यांच्या निवासस्थानी या पादुकांचे पूजन करण्यात आले. गुरुदेव सेवाश्रम पाटसूल येथून वाहनाद्वारे ही ‘पादुका वारी’ निघाली. ही पादुका वारी बुलडाण्यात पोहोचताच ‘जय गुरुदेव’च्या गजरात तिचे स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक भाविक भक्त उपस्थित होते.
राष्ट्रसंतांच्या या पादुका परिवारात आणल्याबद्दल गुरुदेव सेवा मंडळाचे रविकांत तुपकर यांनी आभार मानले. तुकडोजी महाराजांनी ग्रामगिता शेतकऱ्यांना अर्पण केली. यावेळी गुणवंत बोडखे, नरेंद्र नवलकार, विष्णूदादा गवळी, श्रीकृष्ण धोंडेकर, दिपक महाराज सावळे यांच्यासह श्री गुरुदेव परिवाराची मंडळी उपस्थित होती.
लोकरथातून पादुकांचा प्रवास
लोकवर्गणीतून रविकांत तुपकर यांना लोकरथ मिळाला. श्री गुरुदेव सेवाश्रमाच्या वाहनातून या पादुका बुलडाण्यात आल्यानंतर तुपकर यांच्या निवासस्थानातून त्या पादुकांचा प्रवास मात्र तुपकर यांना मिळालेल्या वाहनातून झाला. राष्ट्रसंतांचा चरणस्पर्श झालेल्या पादुका अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीनेही चेतनादायी असल्याने त्या तुपकर यांना नवचेतना प्रदान करतील, असे यावेळी शिवदास महाराज यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Ashadhi Wari 2022 : संत गजानन महाराजांची पालखी आज ऊळे मुक्कामी; तर रूक्मिणी मातेच्या पालखीचा खांडवी येथे मुक्काम
- Ashadhi Wari 2022 : इंदापुरात पार पडला तुकोबांंच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा; हरिनामाच्या गजरात वारकरी तल्लीन
- Ashadhi Wari 2022 : आजपासून विठ्ठलाचे 24 तास दर्शन, यंदा पंढरपुरात विक्रमी भाविक येण्याची शक्यता