(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari 2022 : इंदापुरात पार पडला तुकोबांंच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा; हरिनामाच्या गजरात वारकरी तल्लीन
Ashadhi Wari 2022 : इंदापूरमध्ये आलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये मूकबधिर विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशामध्ये ज्ञानोबा-तुकोबा साकारले होते.
Ashadhi Wari 2022 : संत तुकाराम महाराजांचा पालखीचे आज इंदापूर मध्ये दुसरे रिंगण पार पडले. यावेळी माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील सहकुटुंब सहपरिवार सोहळ्यात सहभागी झाले. संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर शहरात पालखी सोहळा येताच पाटील यांनी सोहळ्याचे स्वागत केले. आणि हर्षवर्धन पाटील यांनी तुकाराम महाराजांच्या पालखीचे सारथ्य केले. या भव्य अशा रिंगण सोहळ्याला हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने.
मूक बधिर मुलांनी साकारले वारकरी
आषाढी वारीच्या वाटेवर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेषात ज्ञानोबा तुकोबा साकारत असतात. मात्र, इंदापूरमध्ये आलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये एक अनोखे चित्र पाहायला मिळाले. याचाच आढावा एबीपी माझाचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी घेतला. यावेळी मूकबधिर विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशामध्ये ज्ञानोबा-तुकोबा साकारले होते. मोठ्या खुबीने ही सगळी मुलं या मूकबधिर दिंडीमध्ये सहभागी झाले होते.
इंदापूरच्या गावकऱ्यांसमोर अखेर प्रशासन झुकलं
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील इंदापूर मधला मुक्काम हा शहरातील रामदास हायस्कूलमध्ये यापूर्वी व्हायचा. मात्र, यावर्षी प्रशासनाने हा मुक्कामाचा पालखीतळ बदलून तो शहराबाहेर ठेवला होता. मात्र, या निर्णयाला इंदापूरमध्ये नागरिकांनी मोठा विरोध केला, आंदोलनं झाली. अखेर प्रशासनाने यापूर्वी ज्या ठिकाणी पालखी मुक्कामी थांबायची तेच ठिकाण कायम ठेवले.
महत्वाच्या बातम्या :
- Ashadhi Wari 2022 : आजपासून विठ्ठलाचे 24 तास दर्शन, यंदा पंढरपुरात विक्रमी भाविक येण्याची शक्यता
- Ashadhi Wari 2022 : पंढरीतील तुळशीमाळेचे मार्केट आषाढीसाठी सज्ज, चायना माळेपुढे खरी तुळशीमाळ कशी ओळखाल?
- Ashadhi Wari 2022 Special : आषाढी यात्रेसाठी मूर्तींची बाजारपेठ सज्ज, शेकडो सुबक दगडी मूर्ती विक्रीसाठी तयार