एक्स्प्लोर
हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया म्हणतात..
हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या घटनेचं देशभरातून स्वागत होत आहे. या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत प्रतिक्रया दिली आहे.

मुंबई : हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या घटनेचं देशभरातून स्वागत होत आहे. खरंतर चार दिवसांपूर्वी जेव्हा हैदाराबादमधून आरोपींना पोलिस घेऊन जात होते, त्यावेळी पोलिसांबद्दल आक्रोश होता. या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत प्रतिक्रया दिली आहे. कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी चारही आरोपींच्या एन्काऊंटरचं समर्थन केलं आहे.
हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. एन्काऊंटर नॅशनल हायवे-44 जवळ पहाटे तीन वाजता झाला. या एन्काऊंटरनंतर हैदराबाद पोलिसांचं चहूबाजूंनी कौतुक होत आहेत. हैदराबादमध्ये लोक फुलांचा वर्षाव करत आहेत. एन्काऊंटरची माहिती मिळताच लोक घटनास्थळी पोहोचले. आता परिस्थिती अशी आहे की लोक पोलिसांना खांद्यावर उचलून त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा तेलंगणा पोलिसांनी आज पहाटे एन्काऊंटर केला. हैदराबादच्या राष्ट्रीय महामार्ग 44वर पोलिसांनी चकमकीत त्यांना कंठस्नान घातलं. हैदराबाद गँगरेपच्या या घटनेचं रिकंस्ट्रक्शन करण्यासाठी पोलिस चारही आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. पोलिसांच्या माहितीनुसार चारही आरोपींनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दरम्यान या एन्काऊंटर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे. तसंच इनकॅमेरा पोस्टमार्टम होणार असल्याचीही माहिती मिळते. 27 नोव्हेंबरला काय घडलं? पोलिसांच्या माहितीनुसार, 27 नोव्हेंबरच्या रात्री महिला डॉक्टरचं ट्रक चालक आणि त्याच्या साथीदारांनी अपहरण केलं. आरोपी तरुणीला निर्जन स्थळी घेऊन गेले आणि तिला जबरदस्तीने दारु पाजली. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एका आरोपीने तिचं तोंड आणि नाक दाबून तिचा जीव घेतला. यानंतर तिथून 27 किमी अंतरावर जाऊन पेट्रोल टाकून तिचा मृतदेह जाळला. तिच्या मृतदेहाशेजारीच फोन आणि घड्याळ लपवलं.कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो. #Hyderabad #Encounter #JusticeForDisha
— Raj Thackeray (@RajThackeray) December 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion