एक्स्प्लोर

'शॅडो कॅबिनेट' सरकारचे वाभाडे काढणार, चांगल्या कामाचं कौतुकही करणार : राज ठाकरे

मनसेच्या शॅडो कॅबिनेटची आज घोषणा झाली. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली आहे. मनसेचं शॅडो कॅबिनेट हे फक्त वाभाडे काढण्यासाठी नव्हे, तर चांगलं काम केल्यास कौतुकही करणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

नवी मुंबई : मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा आज पक्षाच्या चौदाव्या वर्धापनदिनी करण्यात आली आहे. मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी या शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. त्यानंतर मनसेच्या शॅडो कॅबिनेटविषयी बोलताना राज ठाकरेंनी म्हटलं की, सरकारने चांगलं काम केलं तर आम्ही नक्की कौतुक करु. मात्र घोटाळे किंवा अनियमितता आढळली तर वाभाडे काढू. राज ठाकरेंनी या शॅडो कॅबिनेटला प्रतिरुप मंत्रिमंडळ असं नाव दिलं आहे.

कुणालाही ब्लॅकमेल करु नका

महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजघटकांसाठी काम करणारं हे शॅडो कॅबिनेट आहे. सरकारचे वाभाडे जिथे काढायचे आहेत, तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करु, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. सरकारच्या कामाची माहिती काढण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर करताना कुणालाही ब्लॅकमेल करु नका. माहिती अधिकाराचा चांगला वापर करावा अशा सूचनाही राज ठाकरेंनी सर्वांना दिल्या. शॅडो कॅबिनेटच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात तरी तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला या कामात सहभागी करून घेईन, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

मनसेचं शॅडो कॅबिनेट जाहीर; आदित्य ठाकरेंच्या खात्यावर अमित ठाकरे नजर ठेवणार

कामं केली तरी लोक मतदान करत नाहीत

मनसेच्या स्थापनेनंतर गेल्या 14 वर्षात आपण अनेक कामं केली. मात्र तरीही मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात हे कळत नाही. मनसेकडून लोकांना कामाच्या अपेक्षा आहेत, मात्र मतदान आम्हाला नाही करणार याला काय अर्थ आहे? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. मनसेचे चौदा वर्षात अनेक आमदार, नगरसेवक निवडून आले. पक्षाने चौदा वर्षात अनेक चढ-उतार पाहिले. मात्र एवढ्या चढ-उतारानंतर देखील तुम्ही सगळे माझ्यासोबत राहिलात ह्याचा मला जास्त आनंद आहे, अशा शब्दात राज ठाकरेंनी मनसैनिकांचे आभार मानले.

काँग्रेस केंद्रात सत्तेत होती, मात्र आज दिल्लीत एकही आमदार निवडून नाही आला. राजकारणात हे सगळं होत असतं. ज्यावेळी देशात लाट असते, त्यावेळी अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. तरी पण मलाच विचारतात की तुमचा पराभव का झाला? मात्र चौदा वर्षात माध्यमांनी प्रेम दिलं आणि बोचरी टीकाही केली, असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

Shadow Cabinet | शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?

मनसेचं प्रतिरुप कॅबिनेट (शॅडो कॅबिनेट)

गृह, विधी-न्याय : बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजू उमरकर, प्रविण कदम, मराठी भाषा, माहिती तंत्रज्ञान : अनिल शिदोरे, अमित ठाकरे, अजिंक्य चोपडे वित्त आणि गृहनिर्माण : नितीन सरदेसाई, मिलिंद प्रधान, अनिल शिदोरे महसूल आणि परिवहन : अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कुणाल माईनकर ऊर्जा : शिरिष सावंत, मंदार हळबे, विनय भोईल ग्रामविकास : जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे, मदत पुनर्वसन, वने : संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिश सारस्वत, संतोष धुरी शिक्षण : अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, अमोल रोग्ये कामगार : राजेंद्र वागस्कर, गजानन राणे नगरविकास, पर्यटन : संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुरकर सहकार पणन : दिलीप धोत्रे, कौस्तुभ लिमये अन्न व नागरीपुरवठा : राजा चौघुले, महेश जाधव मत्स्यविकास : परशुराम उपरकर महिला व बालविकास : शालिनी ठाकरे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम सोडून) : अभिजीत सप्रे सार्वजिन उपक्रम : संजय शिरोडकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण : रिटा गुप्ता सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार : अमेय खोपकर कौशल्य विकास : स्नेहल जाधव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget