एक्स्प्लोर

मनसेचं शॅडो कॅबिनेट जाहीर; आदित्य ठाकरेंच्या खात्यावर अमित ठाकरे नजर ठेवणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा आज (9 मार्च) चौदावा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेचं शॅडो कॅबिनेट जाहीर करण्यात आलं. यामध्ये गृह, विधी-न्याय खातं बाळा नांदगावकर यांच्याकडे तर मराठी भाषा खातं अमित ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. पक्षाचे नेते अनिल शिदोरे यांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. या कॅबिनेटला 'प्रतिरुप मंत्रिमंडळ' असं नाव देत असल्याचं अनिल शिदोरे म्हणाले. विशेष म्हणजे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खात्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी अमित ठाकरेकडे देण्यात आली आहे. तर गृह खात्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची नजर असेल. नवी मुंबईतील वाशी इथल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेचं हे शॅडो कॅबिनेट आहे. ठाकरे सरकारवरील कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी खातेनिहाय मनसे नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक नेत्याकडे मिळालेल्या संबंधित खात्यातील कारभार आणि त्रुटी शोधून सरकारला जाब विचारण्याचं काम असेल. दरम्यान "महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. सरकारचं वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करु," असं राज ठाकरे शॅडो कॅबिनेटची घोषणा झाल्यानंतर म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन, मराठी भाषा-राजशिष्टाचार ही खाती आहेत. शॅडो कॅबिनेटमध्ये पर्यटन आणि मराठी भाषा खात्याची जबाबदारी आदित्य ठाकरेंचं चुलत भाऊ अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय अमित ठाकरे यांच्याकडे ग्रामविकास, नगरविकास, मराठी भाषा, माहिती व तंत्रज्ञान, मदत पुनर्वसन, वने विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेचं 'शॅडो कॅबिनेट' निश्चित; राज ठाकरे उद्या घोषणा करणार मनसेचं प्रतिरुप कॅबिनेट गृह, विधी-न्याय : बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजू उमरकर, प्रविण कदम, मराठी भाषा, माहिती तंत्रज्ञान : अनिल शिदोरे, अमित ठाकरे, अजिंक्य चोपडे वित्त आणि गृहनिर्माण : नितीन सरदेसाई, मिलिंद प्रधान, अनिल शिदोरे महसूल आणि परिवहन : अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कुणाल माईनकर ऊर्जा : शिरिष सावंत, मंदार हळबे, विनय भोईल ग्रामविकास : जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे मदत पुनर्वसन, वने : संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिश सारस्वत, संतोष धुरी शिक्षण : अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, अमोल रोग्ये कामगार : राजेंद्र वागस्कर, गजानन राणे नगरविकास, पर्यटन : संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुरकर सहकार पणन : दिलीप धोत्रे, कौस्तुभ लिमये अन्न व नागरीपुरवठा : राजा चौघुले, महेश जाधव मत्स्यविकास : परशुराम उपरकर महिला व बालविकास : शालिनी ठाकरे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम सोडून) : अभिजीत सप्रे सार्वजिन उपक्रम : संजय शिरोडकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण : रिटा गुप्ता सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार : अमेय खोपकर कौशल्य विकास : स्नेहल जाधव Shadow Cabinet | शॅडो कॅबिनेट म्हणजे काय? मनसेची स्थापना राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना केली. त्याआधी ते शिवसेनेत सक्रिय होते. अखिल भारतीय विद्यार्थी सेनेची राज्यव्यापी जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर होती. काका बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आलेला राजकीय वारसा त्यांच्याकडे होता. मात्र बाळासाहेबांनी शिवसेनेची धुरा पुत्र उद्धव ठाकरेंकडे सोपवल्यानंतर राज ठाकरे पक्षातून बाहेर पडले. मनसेच्या स्थापनेनंतर मराठी भाषा आणि मराठी तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा घेत आंदोलनं केली. पहिल्याच म्हणजे 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. त्यानंतर पक्षाला गळती लागली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत एकच आमदार विजयी झाला. मात्र पुढे राज ठाकरे यांनी अनेकदा भूमिका बदलल्या. आधी मोदींना पाठिंबा दिला, नंतर त्यांच्याविरोधात प्रचार केला. मग काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत पत्रकार परिषदेतही दिसले. 2019च्या निवडणुकीत सक्षम विरोधी पक्षासाठी मत मागितलं, मात्र यावेळीही मनसेचा एकच आमदार निवडून आला. यानंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची वाट धरत पक्षाचा झेंडा आणि अजेंडाही बदलला. ... जेव्हा मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे स्वतः 'आर्म बँड' बांधतात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : :16 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Embed widget