एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांना संधी, आदित्य ठाकरेंच्या मनात सल कायम? म्हणाले, वाद नको होता म्हणून संमती दिली

Maharashtra Rajya Sabha Election : सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला संधी मिळणे अपेक्षित होतं, संधी तिसऱ्या पक्षाला मिळाली. यानंतर 2029 पर्यंत पुन्हा संधी मिळणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले

मुंबई : राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना संधी मिळाली, मात्र त्या जागेवरून आदित्य ठाकरे यांच्या मनात सल कायम असल्याचं दिसून येत आहे. मविआमधील सर्वात मोठा पक्ष असतानाही तिसऱ्या पक्षाला संधी मिळाली, फक्त वाद नको होता म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निर्णयाला संमती दिल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. आता आपण जो दावा करत होतो तो योग्यच होता, यापुढे 2029 पर्यंत पुन्हा संधी मिळणार नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 

राज्यातील राज्यसभेच्या सात जागांपैकी एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार खासदार म्हणून जाणार होता. या जागेसाठी आदित्य ठाकरे आग्रही होते. त्याचवेळी शरद पवारांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आणि नंतर महाविकास आघाडीने त्यांच्याच नावाला पसंती दिली. यावरून आदित्य ठाकरे नाराज असल्याची चर्चा होती. 

Aaditya Thackeray On Rajya Sabha Election : आदित्य ठाकरेंची सल कायम

राज्यसभेच्या जागेवर दावा असतानाही आपल्याला ती जागा राष्ट्रवादीला सोडावी लागली याची सल आदित्य ठाकरे यांच्या मनात कायम असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला आताची संधी गेल्यानंतर कदाचित 2029 पर्यंत पुन्हा संधी मिळणार नाही. कारण मविआमध्ये आम्ही काही नियम पाळत होतो. त्यानुसार सर्वात मोठ्या पक्षाला पहिला संधी मिळायची. आता सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष आमचा, पण आता संधी तिसऱ्या नंबरच्या पक्षाला संधी मिळाली. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, आताची संधी गेली, यानंतर 2028 साली काँग्रेस दावा करू शकेल. आमच्यातीलही काही इच्छुक असतील तर ते दावा करतील. या सगळ्या गोंधळामध्ये मतांचा कोटा हा जास्त वाढत असल्याचं दिसतंय. त्यामुळे मी जे काही सांगत होतो ते निस्वार्थीपणे सांगत होतो. ती भूमिका माझ्या पक्षासाठी होती.  

Aditya Thackeray Reaction : वाद नको म्हणून संमती दिली

आदित्य ठाकरे म्हणाले की, "राज्यसभेचा जो काही निर्णय झाला तो इंडिया आघाडी म्हणून झाला. आधी काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने दावा केला होता, आम्हीही दावा केला होता. मातोश्रीवर यासंदर्भात बैठक झाली. त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत झालं, मग आम्हीही त्याला संमती दिली. कारण आम्हाला यामध्ये कुठेही वाद नको होता." 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'

Raj Thackeray Meet Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; 'वर्षा' दोघांमध्ये खलबतं, भेटीचं नेमकं कारणही आलं समोर
राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; 'वर्षा' दोघांमध्ये खलबतं, भेटीचं नेमकं कारणही आलं समोर
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Embed widget