राज ठाकरेंनी घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांची भेट घेतली. मुंबई शहरातील विविध प्रश्रांनावर यावेळी त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली.

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांची भेट घेतली. मुंबई शहरातील विविध महत्त्वाच्या प्रश्रांनावर यावेळी त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. मुंबईच्या जमिनीखालून जाणाऱ्या विवीध खासगी कंपन्यांच्या केबल्स आहेत. या कंपन्यांकडून पैसे का घेतले जात नाहीत? असा प्रश्न यावेळी मांडल्याचे राज ठाकरे म्हणाले. तसेच महापालिकेच्या रुग्णालयांवर इतर राज्यातून येणाऱ्या पेशंटचा खूप मोठा लोड आहे. त्यामुळं इतर राज्यांमधून येणाऱ्या पेशंटसाठी काही वेगळे चार्ज लावता येईल का? यावर चर्चा झाल्याचे राज ठाकरे म्हणाले.
आयुक्तांच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
आज राज ठाकरे यांनी विविध प्रश्नासंदर्भात मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुंबईच्या जमिनीखालून जाणाऱ्या विवीध खासगी कंपन्यांच्या केबल्स आहेत.या कंपन्यांकजून पैसे का घेतले जात नाही असा प्रश्न मी मांडल्याचे राज ठाकरे म्हणाले. महापालिकेच्या रुग्णालयांवर इतर राज्यातून येणाऱ्या पेशंटचा लोड खूप मोठा आहे. त्यामुळं इतर राज्यातील पेशंटकडून काही वेगळे चार्ज लावता येतील का यावर देखील चर्चा झाली. तसेच मूर्तीकारांनी पिओपीच्या मूर्तींबाबत आता विचार करायला हवा. जर नियम माहित आहेत, प्रदुषण होतंय हे माहितीय तर मूर्तीकारांनी विचार करायला हवा असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
कचरा संकलन कर किंवा झोपडपट्टीमधील व्यावसायिकांवर कर लावला जात असेल तर जमिनीखालून जाणाऱ्या युटीलीटीज साठी कर का लावला जाऊ नये? असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील केला. यावेली मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, हेही उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
























