एक्स्प्लोर
उरणच्या समुद्रकिनारी महाकाय मृत व्हेल मासा आढळला!
उरणच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या खारदांडा या गावाजवळ बुधवारी संध्याकाळी एक भलामोठा व्हेल मासा मृतावस्थेत आढळला.

रायगड : रायगड जिल्ह्यातील उरणच्या पश्चिम किनारपट्टीवर कुजलेल्या अवस्थेतील अवाढव्य असा मृत व्हेल मासा आढळून आला आहे. या माशाची लांबी सुमारे 35 ते 40 फूट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उरणच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या खारदांडा या गावाजवळ बुधवारी संध्याकाळी एक भलामोठा व्हेल मासा मृतावस्थेत आढळला. तर आज सकाळी गावकऱ्यांनी मासा पाहिला. त्यानंतर हा मासा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली आहे.
मृतावस्थेतील या महाकाय माशाचं तोंड काहीसं कुजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे पाच ते सहा दिवसांपूर्वीच माशाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या मृत माशामुळे परिसरात दुर्गंधी पसरु लागली आहे. दरम्यान, सहा वर्षांपूर्वी उरणच्या पिरवाडी समुद्रकिनारी हंपव्हेल प्रजातीचा सुमारे 40 फूट लांब मासा मृतावस्थेत आढळून आला होता. तर, दांडा गावाच्या हद्दीतही गेल्या दोन वर्षांपूर्वी कुजलेल्या अवस्थेतील व्हेल मासा आढळला होता.
मृतावस्थेतील या महाकाय माशाचं तोंड काहीसं कुजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे पाच ते सहा दिवसांपूर्वीच माशाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या मृत माशामुळे परिसरात दुर्गंधी पसरु लागली आहे. दरम्यान, सहा वर्षांपूर्वी उरणच्या पिरवाडी समुद्रकिनारी हंपव्हेल प्रजातीचा सुमारे 40 फूट लांब मासा मृतावस्थेत आढळून आला होता. तर, दांडा गावाच्या हद्दीतही गेल्या दोन वर्षांपूर्वी कुजलेल्या अवस्थेतील व्हेल मासा आढळला होता. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















