एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

जुगार अड्ड्यावर धाड, माजी आमदारासह 29 जणांना अटक, सोलापुरातील कारवाईनं खळबळ 

माजी आमदार रविकांत पाटील (EX MLA Ravikant Patil) यांच्यासह 29 जणांना जुगार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे.

सोलापूर : कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील (EX MLA Ravikant Patil) यांच्यासह 29 जणांना जुगार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. सोलापुरातील होटगी रोडवरील क्लब 9 येथे जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. गुन्हे शाखेतर्फे हा हॉटेलवर धाड टाकली असता या ठिकाणी अवैधरित्या जुगार सुरू असल्याचे आढळून आले. लोकांना जुगार अड्डा स्वतः माजी आमदार रविकांत पाटील चालवत असल्याचा आरोप पोलिसांचा आहे. धाड टाकल्याच्या वेळी माजी आमदार रविकांत पाटील हे स्वतः हॉटेलच्या बाहेर कार्यकर्त्यासह बसलेले होते. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

मात्र हॉटेलमध्ये पोलीस गेल्यानंतर जवळपास 19 जण हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून रोख 2 लाख 24 हजार 540 रुपये, 4 लाख 19 हजारांचे मोबाईल, 13 हजारांचे जुगार साहित्य असे एकूण 6 लाख 57 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सर्व 29 आरोपींना रात्री उशिरापर्यंत विजापूर नाका पोलीस ठाण्यात बसविण्यात आले होते.रात्री उशीरा सर्व आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली. माजी आमदार रविकांत पाटील यांना अटक झाल्याचे कळताच कर्नाटकातील त्यांच्या समर्थकांनी विजापूर नाका पोलीस ठण्यासमोर मोठी गर्दी केली होती. 

पैशांऐवजी कॉइनचा वापर

यावेळी जुगारात पैशांऐवजी कॉइनचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. पैसे देऊन कॉइन खरेदी करायचे. या कॉइनचा वापर करून जुगार खेळला जायचा. अगदी दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंतचे कॉइन या जुगार अड्ड्यावर विकले जात होते. धाडी दरम्यान पोलिसांनी पाच हजार रुपयांचे कॉईन्स देखील जप्त केले आहेत.

जुगार खेळण्यासाठी आलेल्या या लोकांपैकी बहुतांश लोक हे कर्नाटकातील असल्याचं दिसत आहे. मोठ्या आलिशान गाड्यांमधून हे लोक सोलापुरात जुगार खेळण्यासाठी येत होते. पोलिसांची धाड पडल्याचे लक्षात येतात अड्यावरून पळून जाण्यात काही जण यशस्वी देखील झाले. 

रविकांत पाटील हे कर्नाटकातील इंडीचे आमदार राहिले आहेत. 1994, 1999, 2004 अशा तीन टर्म सलग निवडून आले होते. विशेष म्हणजे रविकांत पाटील यांनी अपक्ष राहून या निवडणुका लढवल्या होत्या. रविकांत पाटील हे कायम कोणत्या ना कोणत्या विषयावरून नेहमीच चर्चेत राहतात. 

काल रविकांत पाटील यांना अटक झाल्याचे कळताच त्यांच्या समर्थकांनी पोलीस स्थानकाबाहेर मोठी गर्दी केली होती. कर्नाटकातून देखील अनेक कार्यकर्ते हे सोलापुरात दाखल झाले होते. त्यामुळे सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठण्यासमोरील तणावपूर्ण बनले होते. दरम्यान अटक केलेल्या सर्व आरोपींना पोलीस ठाण्यात बाहेर फरशीवरच बसवले होते. तर माजी आमदार रविकांत पाटील यांना मात्र चौकशी कक्षात बसविण्यात आले होते.  पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलीय.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

इतर महत्वाच्या बातम्या

Amit Shah Maharashtra Tour : अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर; प्रवरानगरमध्ये देशातील पहिल्या सहकार परिषदेला हजेरी

Omicron Cases : राज्यात ओमायक्रॉनच्या आठ रुग्णांची भर, एकूण रुग्ण 40 तर आतापर्यंत 25 जणांची ओमायक्रॉनवर मात

मुलांना कोरोना लस मिळण्याचा मार्ग मोकळा, सीरमच्या Covovax लसीच्या आपत्कालीन वापराला WHO ची मान्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूकAjit Pawar on Chief Minister : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांसाठी कुणी लावली फिल्डिंग?Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोलाBhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Embed widget