'18 वर्ष झाल्यावर पंतप्रधान निवडू शकतो तर पार्टनर का नाही', मुलींचं लग्नाचं वय वाढवण्याला ओवेसींचा विरोध
Asaduddin Owaisi on Women’s Marriage Age: ओवेसींनी म्हटलं आहे की, 18 वर्षाच्या वयात एक भारतीय व्यक्ती करारांवर सही करु शकतो, व्यवसाय सुरु करु शकतो, पंतप्रधान निवडू शकतो तर मग लग्न का नाही?
Asaduddin Owaisi on Women’s Marriage Age: केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाचं वय हे 18 वरुन 21 वर नेण्याचा निर्णय घेतला आहे. आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विवाहासाठी मुलींचे किमान वय 18 वरून 21 वर्ष करणारं विधेयक सरकार याच अधिवेशनात आणणार आहे. गुरुवारी केंद्रीय कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यावर बोलताना AIMIM प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. '18 वर्ष झाल्यावर पंतप्रधान निवडू शकतो तर पार्टनर का नाही', असं त्यांनी म्हटलं आहे. ओवेसींनी म्हटलं आहे की, 18 वर्षाच्या वयात एक भारतीय व्यक्ती करारांवर सही करु शकतो, व्यवसाय सुरु करु शकतो, पंतप्रधान निवडू शकतो तर मग लग्न का करु शकत नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे की, आपण सरकार आहोत, गल्लीतील चाचा किंवा अंकल नाहीत की कुणी लग्न करावं काय खावं याचा निर्णय घ्यावा. माझं मत आहे की, मुलांचं लग्नाच्या वयाची अट 21 वरुन 18 वर्ष करायला हवं, असं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत अशी अनेक राज्य आहेत जिथं लग्नाच्या वयाची अट वय 14 वर्ष आहे. ब्रिटन आणि कॅनडामध्ये लग्नाच्या वयाची अट 16 वर्ष आहे.
This is a very good example of paternalism of the Modi govt. At the age of 18, an Indian citizen can sign contracts, start businesses, choose Prime Ministers & elect MPs & MLAs. I'm of the opinion that the 21 age limit for boys should be reduced to 18: AIMIM MP Asaduddin Owaisi pic.twitter.com/1fu1DlLZdx
— ANI (@ANI) December 17, 2021
>
समाजवादी पक्षाचे खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
केंद्र सरकारच्या या निर्णयावर समाजवादी पक्षाचे खासदार शफीफ उर रहमान वर्क यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुलींच्या विवाहाचे वय वाढवल्याने त्या अधिक बिघडतील असं त्यांनी म्हटलं आहे. समाजवादी पक्षाचे खासदार शफीफ उर रहमान वर्क यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे. मोदी सरकारने मुलींना आता संवैधानिक अधिकार द्यायची तयारी केली असताना सपाच्या खासदारांचे हे वक्तव्य गुलामगिरीचे द्योतक आहे, मुलींनी नेहमी गुलामीत ठेवण्याची मानसिकता यावरुन स्पष्ट होते असं मत राज्यसभेचे खासदार हरनाथ सिंह यांनी व्यक्त केलं.
विवाहासाठी मुलींचे किमान वय 18 वरून 21 वर्ष करणारं विधेयक सरकार याच अधिवेशनात आणणार आहे. गुरुवारी केंद्रीय कॅबिनेटने या निर्णयाला मंजुरी दिली. सोमवारी संसदेच्या अधिवेशनात हे विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आहे. सध्या देशात मुलीच्या लग्नासाठी किमान 18 वर्षे वयाची अट आहे. गेल्या वर्षी या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सनं आपल्या अहवालात लग्नाचं किमान वय 18 वरून 21 वर्षे करण्याची शिफारस केली होती. माजी खासदार जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. टास्क फोर्सनं आपल्या अहवालात आई बनण्याची वयोमर्यादा आणि महिलांशी संबंधित इतर समस्यांबाबतही आपल्या शिफारशी दिल्या होत्या.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :
- लग्नासाठी मुलींचं वय 21 वर्ष! लवकरच निर्णयाची शक्यता; केंद्रीय कॅबिनेटची प्रस्तावाला मंजुरी
- मुलींच्या लग्नाचं वय आता 18 वरुन 21 करण्याचा केंद्राचा विचार, हिवाळी अधिवेशनात विधेयक सादर होण्याची शक्यता
- मुलींच्या विवाहाचं वय वाढवल्यास त्या बिघडतील; सपाचे खासदार शफीफ उर रहमान वर्क यांचं वादग्रस्त वक्तव्य