एक्स्प्लोर
पंढरपुरात विठ्ठल चरणी जुन्या हजार-पाचशेच्या नोटांचा पाऊस
पंढरपूर : एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे हजार आणि पाचशेच्या नोटा विठ्ठलाचरणी अर्पण करण्याचं प्रमाण वाढलं आहे.
नोटाबंदीनंतर हजार रुपयांच्या नोटांच्या संख्येत 30 टक्के तर पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये तब्बत 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत दानपेटीत सुट्टी नाणी, 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा वाहण्याचं प्रमाण अधिक होतं. मात्र जुन्या नोटा खपवण्यासाठी अनेकांनी हा पर्याय अवलंबला असावा.
8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर हजार पाचशेच्या नोटा अर्पण करण्याचं प्रमाण वाढलं आहे. शनिवारपर्यंत मंदिर समितीनं 1 कोटी 81 लाख रुपये बँकेत जमा केले आहेत.
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या दानपेट्या उघडल्या
पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या दानपेट्या शनिवारी उघडण्यात आल्या. दान आणि देणगी स्वरूपात जमा होणाऱ्या चलनी नोटा, नाणी त्याच दिवशी संबंधित बँकांमध्ये जमा करण्याचे आदेश राज्यातील सर्व देवस्थाने आणि धर्मादाय संस्थांना देण्यात आले आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement