एक्स्प्लोर
पुण्याच्या कॉन्स्टेबल दाम्पत्याचा एव्हरेस्ट सर केल्याचा दावा खोटाः नेपाळ
पुणेः एव्हरेस्ट सर केल्याचा दावा करणाऱ्या पुण्याच्या कॉन्स्टेबल जोडप्यावर नेपाळमध्ये 10 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ऐव्हरेस्ट सर करणारं आपण पहिलं भारतीय जोडपं असल्याचा दिनेश आणि तारकेश्वरी राठोडचा दावा खोटा असल्याचं नेपाळ सरकारनं म्हटलं आहे.
नेपाळकडून राठोड दाम्पत्याला 10 वर्षांच्या बंदीची नोटीस पाठवण्यात आली. हा प्रकार पोलिस आणि देशाची इमेज बिघडवणारा असल्याचं पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्लांनी म्हटलं आहे. राठोड दाम्पत्य पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. त्यांच्या या कारस्थानामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन शुक्लांनी दिलं आहे.
30 वर्षीय तारकेश्वरी आणि दिनेश हे दोघंही 2006 मध्ये पोलिस सेवेत रुजू झाले. दोघंही पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. दोघं 2008 मध्ये विवाहबंधनात अडकले. लग्न झाल्यापासूनच एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न उराशी बाळगल्याचं ते सांगतात. इतकंच काय, एव्हरेस्टवर पाऊल ठेवेपर्यंत अपत्यसुख अनुभवायचं नाही, अशी खूणगाठही त्यांनी मनाशी बांधली होती.
संबंधित बातमीः पुण्याच्या पोलीस दाम्पत्याकडून एव्हरेस्ट सर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement