नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत करणे गरजेचे: देवेंद्र फडणवीस
मी काळजीवाहू मुख्यमंत्री होतो तरी दहा हजार कोटींचे पॅकेज दिले होते. आम्ही केंद्र सरकार मदत देणार म्हणून वाट बघत बसलो नाही, याची आठवण देवेंद्र फडणवीसांनी करुन दिली.
बीड : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्याच्या तिजोरीतून आता तातडीने मदत करावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि परत या वर्षी आतिवृष्टी झालीय. अनेक ठिकाणी पंचनामे झाले नाहीत. ज्या ठिकाणी ऊस पडला आहे हे निकषात बसत नाही असे सांगितले जात आहे. निकषात बसत नाही असं म्हणून कसं चालेल. नियमात बसत नसेल तर नियम बदलले पाहिजेत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला उद्देशून सांगितलं.
पीक विमा कंपन्या लोकांना मूर्ख बनवत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत करणे गरजेचे आहे. मी काळजीवाहू मुख्यमंत्री होतो तरी दहा हजार कोटींचे पॅकेज दिले होते. आम्ही केंद्र सरकार मदत देणार म्हणून वाट बघत बसलो नाही, याची आठवण फडणवीसांनी करुन दिली. लातूर जिल्ह्यात बियाण्याचे वाटप लॉटरी पद्धतीने केले जात आहे. हे बियाणे आहे का म्हाडाची लॉटरी पद्धत. शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे का?, असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला.
संबंधित बातम्या