एक्स्प्लोर

नुकसानग्रस्त भागात प्रशासन पोहोचलं नाही, मुख्यमंत्र्यांकडून दिलासा नाही : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कोणालाही मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांकडून राजकीय स्टेटमेंटची अपेक्षा नाही. सरकारचा नाकर्तेपण झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे," अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

उस्मानाबाद : "ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. मात्र आठ दिवस झाले, नुकसानग्रस्त भागात प्रशासन पोहोचलेलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कोणालाही मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांकडून राजकीय स्टेटमेंटची अपेक्षा नाही. सरकारचा नाकर्तेपण झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे," अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. उस्मानाबादमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचा वर्षभरापूर्वीचा व्हिडीओही दाखवून त्यांनी घेतलेल्या भूमिकेची आठवण करुन दिली.

"अनेक ठिकाणी खरडून गेली आहे, माती वाहून गेली. तिथे पुढील पीक घेणं अशक्यप्राय आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष योजना हवी. मोबाईलने फोटो काढून पंचनामे उरका आणि तात्काळ मदत करा. जे धनादेश दिले, त्यातील रक्कम ही अतिशय कमी आहे. त्यामुळे सरकारने एकप्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे," असा आरोपही फडणवीस यांनी केला.

इच्छाशक्ती असेल तर राज्य सरकार मदत करु शकतं. काहीही झालं तरी केंद्राकडे बोट दाखवतात. केंद्राची मदत कधी मिळते हे शरद पवारांना माहित आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला नक्कीच मदत करेल. पण केंद्राआधी राज्य काय मदत करणार असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. अडचणीत अडकलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे. संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, हे सरकारने ठरवावं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"कर्ज काढल्याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी केलं. त्यांच्या या भूमिकेला देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे. "महाराष्ट्राला 1 लाख 20 हजार कोटी रुपयांचं कर्ज काढता येतं. महाराष्ट्राने आतापर्यंत 60 हजार कोटी रुपये कर्ज काढलं आहे. आणखी 60 हजार कोटी रुपयांचं कर्ज काढता येऊ शकतं," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

"राज्याला मदत मिळावी यासाठी मी देखील गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोललो आहे. केंद्राकडे मी बोललो काय आणि उद्धव ठाकरे बोललो काय मदत तेवढीच मिळेल. माझ्या बोलण्याने जास्त आणि उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यानं कमी असं होणार नाही. मोदीजींचा तो स्वभाव नाही," असंही फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या

ठाकरे सरकार हे रडणारे सरकार आहे, ते काय अश्रू पुसणार? : प्रवीण दरेकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करु नये, देवेंद्र फडणवीसांची टीका

परतीच्या पावसाचं संकट टळलेलं नाही, घाईगडबडीने निर्णय घेणार नाही : मुख्यमंत्री

Devendra Fadnavis | "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करू नका", देवेंद्र फडणवीसांची टीका

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Tiranga Rally: कमबॅक करना पडेगा! मुंबईच्या तिरंगा मोर्चातील बाळासाहेब ठाकरेंचं जेन झी स्टाईल पोस्टर व्हायरल
कमबॅक करना पडेगा! मुंबईच्या तिरंगा मोर्चातील बाळासाहेब ठाकरेंचं जेन झी स्टाईल पोस्टर व्हायरल
Sanjay Shirsat: मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : राज-उद्धव स्टेजवर, शिवाजी पार्ककडे येणारे सगळे रस्ते गर्दीने भरले अन् ए. आर. रेहमानचं गाणं लागताच सगळं वातावरण देशभक्तीने भारुन गेलं
राज-उद्धव स्टेजवर, शिवाजी पार्ककडे येणारे सगळे रस्ते गर्दीने भरले अन् ए. आर. रेहमानचं गाणं लागताच सगळं वातावरण देशभक्तीने भारुन गेलं

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांचा साचलेला संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांचा साचलेला संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवासांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवासांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Sanjay Shirsat: मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
Uddhav Thackeray: मुंबईच्या तिरंगा मोर्चातील उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण, मोदींपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं, म्हणाले, 'ही ठिणगी विझून देऊ नका'
मुंबईच्या तिरंगा मोर्चातील उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण, मोदींपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं, म्हणाले, 'ही ठिणगी विझून देऊ नका'
Embed widget