एक्स्प्लोर

Ajit Pawar : काहींची भाषणं नको तितकी लांबली.... अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला

दसरा मेळाव्यात काहींची भाषणं नको तितकी लांबली असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.

Ajit Pawar : मी दसरा मेळाव्यात झालेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघांचीही भाषणे ऐकली. मात्र, काहींची भाषणं नको तितकी लांबली असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. आता शिवसैनिकांनी निर्णय घ्यायला हवा. आपली पुढची भूमिका काय असायला हवी. कोणाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, कोणाची मुळ शिवसेना आहे, याबाबत विचार करावा असेही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. काहींची भाषण नको तितकी लांबल्याचे अजित पवार म्हणाले. कोणाची लांबली त्याचा विचार आता तुम्हीच करा असेही अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्य गांभीर्यानं घेऊ नका असेही अजित पवार म्हणाले. 

10 कोटी रुपये खर्चून बसेसची व्यवस्था केली, मात्र सर्वसामान्य लोकांना एसटी मिळाली नाही

दसरा मेळाव्यासाठी 10 कोटी रुपये खर्चून बसेसची व्यवस्था केली होती. परंतू, त्यामुळं सर्वसामान्य लोकांना एसटी मिळाली नाही असे म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटावर टीका केली. दोन्हीकडील दसऱ्या मेळाव्याला गर्दी होती. ती कशी होती काय होती असेही अजित पवार म्हणाले. झेंडा शिवसेनेचा मात्र, अजेंडा राष्ट्रवादीचा असल्याची टीका शिंदे गटाने केली होती. यावर अजित पवार म्हणाले की, मंत्रीमंडळात असताना एकनाथ शिंदे यावर कधी बोलले नाहीत.  ते माझ्या उजव्या बाजूला बसायचे. आम्हाला अनेक वर्ष विविध पक्ष सोबत घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. 1999, 2004, 2009 आणि 2019 ला देखील अनेक पक्षाचे सरकार चालवले आहे असे अजित पवार म्हणाले. आत्तापर्यंतचे निर्णय सर्वांनी मिळून घेतल्याचे अजित पवार म्हणाले. शिंदे गटाची वक्तव्य ही राजकीय स्वरुपाची असल्याचे पवार म्हणाले. 

वेदांता प्रकल्पात टक्केवारी मागितली हे सिद्ध करुन दाखवा

वेदांता प्रकल्पात टक्केवारी मागितली म्हणून तो प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका महाविकास आघाडीवर होत आहे. यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. हे अत्यंत चुकीचं आहे. हे सिद्ध करुन दाखवावे असं आव्हान देखील अजित पवार यांनी यावेळी दिलं. वेदांचा प्रकल्प गुजरातला गेल्यानं दोन लाख तरुणांचा रोजगार गेला आहे. यातून तरुणांचा रोष आपल्यावर येईल, त्यासाठी अशी वक्तव्य केली जात असल्याचे अजित पवार म्हणाले. दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. यामध्ये काँग्रेसने आधीच शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. आता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget