एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2026: महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, एकनाथ शिंदेंच्या सेनेकडून पवारांविरोधात 'हा' नेता निवडणुकीच्या रिंगणात?

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2026) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या विरोधात रोहित टिळक (Rohit Tilak) यांना रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत थेट पवार विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. 

Rajya Sabha Election 2026: महाविकास आघाडीची शक्तीप्रदर्शनासह एंट्री

शरद पवार यांच्या उमेदवारी अर्जावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. सुप्रिया सुळेंसोबतच संजय राऊत, जयंत पाटील, भास्कर जाधव, रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.  मात्र, आदित्य ठाकरे हे अर्ज दाखल करताना गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Rajya Sabha Election 2026: शिंदे गटाचे दोन उमेदवार

शिवसेनेच्या वाट्याला एक जागा असली तरी शिंदे गटाने दोन उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे समोर आले आहे. सोलापूर येथील पक्षाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि रोहित टिळक, जे पुण्यातील काँग्रेसशी संबंधित असून लोकमान्य टिळकांचे पणतू आहेत. या दोघांनाही उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ते विधानभवनात दाखल होणार आहेत.

Rajya Sabha Election 2026: राज्यसभेचं गणित आणि वाढलेली उत्सुकता

शिंदे गटाला दुसरी जागा जिंकण्यासाठी अतिरिक्त मतांची गरज आहे. त्यामुळे सातव्या जागेसाठीची लढत अधिक रंगतदार ठरणार आहे. शरद पवार यांच्याविरोधात रोहित टिळक यांची उमेदवारी देऊन शिंदे गटाने मोठा राजकीय डाव टाकल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या 37 जागांसाठी देशभरात निवडणूक प्रक्रिया सुरू असून महाराष्ट्रातील ही लढत विशेष लक्षवेधी ठरत आहे. पुढील काही दिवसांत अंकगणित आणि राजकीय रणनीती यांचा कस लागणार आहे.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य- (Retiring Rajya Sabha members from Maharashtra)

शरद पवार (श.प. गट)
रामदास आठवले (रिपाई) 
फौजिया खान (श.प. गट)
रजनी पाटील (काँग्रेस)
प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
भागवत कराड (भाजप)

राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)

5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
6 मार्च – अर्जांची छाननी
9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी
कसं असणार राज्यसभेतल्या जागांसाठीचं गणित? (Rajyasabha Election 2026)
राज्यसभेच्या एकूण जागा : 7

कसं असणार राज्यसभेतल्या जागांसाठीचं गणित? (Rajyasabha Election 2026)

राज्यसभेच्या एकूण जागा : 7

  1. विद्यमान विधानसभा सदस्य : 286 (अजित पवार आणि शिवाजी कर्डिले या दोन जागा रिक्त)
  2. कोटा : 3576 (म्हणजे 3600 मते) ( येथे एका आमदाराचे मत म्हणजे 100, म्हणून 36 आमदार हा कोटा)
  3. (फॉर्म्युला : 286 गुणिला 100/भागिला 7 जागा+1/अधिक+1)
  4. (अर्थात एकूण झालेल्या मतदानावरुन कोटा निश्चित होतो)

भाजपा : 136 (कर्डिले 1 वगळता)

  1. तीन जागांसाठी लागणार : 108
  2. भाजपाकडे अतिरिक्त मते : 28

शिवसेना : 56

  1. एक जागेसाठी लागणार : 36
  2. अतिरिक्त मते : 20

राष्ट्रवादी : 40 (अजित पवार वगळता)

  1. एक जागेसाठी लागणार : 36
  2. अतिरिक्त मते : 4

    महायुती : 52 अतिरिक्त मते

सहाव्या जागेची 36 मते वजा केली तरी 16 मते अतिरिक्त...म्हणजे सातवा उमेदवार निवडून आणायचा असेल तर 20 मते अतिरिक्त आणावी लागतील.

उबाठा : 20

  1. एका जागेसाठी अतिरिक्त लागतील : 16

शरद पवार : 10

  1. एका जागेसाठी अतिरिक्त लागतील : 26

काँग्रेस : 16

  1. एका जागेसाठी अतिरिक्त मते लागतील : 20

(त्यामुळे महाविकास आघाडीचा एक उमेदवार जिंकायचा असेल तर दोन शक्यता: तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक उमेदवार देणे, किंवा काँग्रेस आणि उबाठा हे दोनच पक्ष एकत्र आले तरी 36 असे काठावरचे बहुमत त्यांना लाभते)

आणखी वाचा 

Rajya Sabha Election 2026: एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, राज्यसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठांना डावलत 'या' नवख्या चेहऱ्याला संधी, भल्याभल्यांचा अंदाज चुकला

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणूक जाहीर, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं मोठं वक्तव्य; सपकाळ म्हणाले, 'उद्धव ठाकरे ⁠विधान परिषदेवर जात असतील तर आमचा पाठिंबा, पण...'
विधान परिषद निवडणूक जाहीर, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं मोठं वक्तव्य; सपकाळ म्हणाले, 'उद्धव ठाकरे ⁠विधान परिषदेवर जात असतील तर आमचा पाठिंबा, पण...'
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, 10 उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, मतदानाआधीच महायुतीचा एक विजय निश्चित, प्रज्ञा सातवांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक!
विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट, 10 उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, मतदानाआधीच महायुतीचा एक विजय निश्चित, प्रज्ञा सातवांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक!
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी सोलापूरच्या नेत्यांच्या जोर बैठका, राजेंद्र राऊत, राजन पाटील, राम सातपुते यांची चढाओढ
विधान परिषदेसाठी सोलापूरच्या नेत्यांच्या जोर बैठका, राजेंद्र राऊत, राजन पाटील, राम सातपुते यांची चढाओढ
BJP : महाराष्ट्र भाजपचे आता ‘मिशन बंगाल’, मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष रेल्वे 
महाराष्ट्र भाजपचे आता ‘मिशन बंगाल’, मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष रेल्वे 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget