एक्स्प्लोर
अर्ज मागे घेताना क्षुल्लक चूक, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे दोन्ही अर्ज बाद

नागपूर : नागपुरात अर्ज मागे घेताना केलेल्या क्षुल्लक चुकीमुळे निवडणुकीला मुकावं लागलं आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार उषा चौधरींनी निवडणुकीसाठी दोन अर्ज भरले होते. राष्ट्रवादीनं त्यांना एबी फॉर्म्स देत त्यांची उमेदवारी निश्चित केली. मात्र अखेरच्या क्षणाला फॉर्म मागे घेताना चुक केल्यामुळे त्यांना निवडणुकीतून बाहेर पडावं लागलं आहे.
नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार उषा चौधरी यांनी निवडणुकीसाठी दोन अर्ज भरले होते. त्यांनी एक अर्ज राष्ट्रवादीकडून तर एक अपक्ष अर्ज भरला होता. बी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांनी हे दोन फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला होता.
राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर अपक्ष अर्ज मागे घेण्यासाठी शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज दाखल केला. मात्र कोणता अर्ज मागे घ्यायचा हे अर्जावर नमुद न केल्यामुळे त्याचे दोन्ही अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या एका क्षुल्लक चुकीमुळे त्यांना निवडणुकीला मुकावं लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
