एक्स्प्लोर
पक्षांतराच्या बातम्या पेरण्यात काँग्रेसचाच हात : राणे
![पक्षांतराच्या बातम्या पेरण्यात काँग्रेसचाच हात : राणे Narayan Rane Dismisses Rumours Surrounding Leaving Congress पक्षांतराच्या बातम्या पेरण्यात काँग्रेसचाच हात : राणे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/23111312/Narayan-Rane1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मी कधी शिवसेनेत, तर कधी भाजपात जातोय अशा बातम्या येत आहेत. पण मी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र अशा बातम्या पेरण्यांमागे काँग्रेसचाच हात असल्याचा बेधडक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला.
नारायण राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गेल्या 15 दिवसापासून रंगल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी स्वत: मीडियासमोर येऊन स्पष्टीकरण दिलं. "मी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. कोणताही नेता मला भेटलेला नाही, तशी चर्चाही झालेली नाही. गेले 15 दिवस चर्चा सुरु आहे. मी कोणालाही न भेटता अशा बातम्या खात्री न करता पसरवणं चुकीचं आहे, त्यामुळे मीडियात येऊन स्वत: स्पष्टीकरण द्यावं म्हणून मी स्पष्टीकरणासाठी आलो," असं राणे म्हणाले. "मी काही कामानिमित्त मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांना भेटलो म्हणजे भाजपात जातोय असं होत नाही. या बातम्या पेरण्यामागे काँगेसच्याच नेत्यांचा हात आहे. त्यांचंच षडयंत्र असल्याचं माझं मत आहे," असा आरोपही नारायण राणे यांनी केला. पाहा व्हिडीओ राणेंचे महत्त्वाचे मुद्दे सरकार उघडं पडण्याच्या भीतीने, बजेट पास करुन घेण्यासाठी आमदार निलंबनाचा डाव - नारायण राणे अशा बातम्या पेरण्याचं काम काँग्रेसच्याच लोकांकडून सुरु आहे : नारायण राणे या राज्याची दिवाळखोरीकडे वाटचाल, निर्यात थांबलीय, उत्पादन रखडलंय, बेकारी वाढतेय - नारायण राणे मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणजे भाजपमध्ये जातोय असं नाही : नारायण राणे 19 आमदारांना निलंबित करुन सरकारने काय साधलं? सरकारला अधिवेशना चालवायचंच नाहीय- नारायण राणे माझा पक्षांतर करण्याचा विचार नाही, त्या बातम्या निव्वळ अफवा : नारायण राणे जनतेच्या प्रश्नासाठी कायमस्वरुपी निलंबित होण्यास तयार, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी - नारायण राणे मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणजे भाजपात जातो असं नाही : नारायण राणे निलंबन करुन कर्जमाफी देत असाल, तर कायमस्वरुपी निलंबन करावं - राणे संघर्षाचा माझा पिंड, संघर्ष करत राहणार- नारायण राणे मी भाजपत जातोय अशा बातम्या पेरण्याचं काम काँग्रेसमधीलच लोक करत आहेत - नारायण राणे पक्षांतराच्या बातम्या काँग्रेसमधलेच नेते पेरत आहेत : राणे राणे कुटुंबीय कामं करत असूनही डावलण्याचा प्रयत्न - राणे काही कामानिमित्ताने मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, पण याचा अर्थ मी भाजपत जातोय असं नाही - नारायण राणे मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, कोणत्याही पक्षाचा नेता मला भेटलेला नाही : नारायण राणेअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)