एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एसटी संप : राज्यभरात शेकडो कर्मचारी निलंबित, प्रवाशांचे हाल
पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केलं. अचानक काम बंद केल्याने सुट्टीवरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले.
धुळे: एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून अचानक कामबंद आंदोलन सुरु केलं. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे. अचानक काम बंद केल्याने सुट्टीवरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. अचानक काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
राज्यभरात शेकडो कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. एकट्या बीड जिल्ह्यात 121 जणांना सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आलं. तर यवतमाळ जिल्ह्यातील एकूण नऊ आगारातील 46 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, नाशिक आगारातील काही जणांचं निलंबन मागेही घेण्यात आलं. पण मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
संपामुळे एसटी महामंडळाचं 15 कोटींचं नुकसान
संपामुळे एसटीचा सुमारे 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. दिवसभरात महाराष्ट्रातील 250 आगारातून सुमारे 30 टक्के बसेसच्या फेऱ्या सुटल्या, तर राज्यातील 25 आगार पूर्ण क्षमतेने चालू होते.
राज्यातील 145 आगारांमध्ये काही प्रमाणात वाहतूक सुरु होती. तसेच राज्यातील 80 आगारातून दिवसभरात एकही बसची फेरी बाहेर पडली नाही. या संपाचे परिणाम मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यात मोठया प्रमाणात जाणवले.
तुलनेने मराठवाडा आणि विदर्भामध्ये 60 टक्के वाहतूक सुरु होती. संध्याकाळी चार वाजेपर्यंत होणाऱ्या 35 हजार 249 बस फेऱ्यांपैकी 10 हजार 397 फेऱ्या सुरळीत सुरु होत्या. मात्र रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे प्रवाशांची मोठी तारांबळ झाली.
LIVE UPDATE
6.05 PM यवतमाळ : जिल्ह्यातील एकूण नऊ आगारातील 46 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई- वणी आगार : 5 चालक, 3 वाहक, एक वाहन परीक्षक
- पुसद आगार : 1 चालक , 7 वाहक
- पांढरकवडा आगार : 13 चालक, 13 वाहक
- नेर आगार : 1 चालक ,1 वाहक
- एकूण : 45 जणांवर कारवाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement