राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकण्याचा निर्णय, 13 सप्टेंबरऐवजी 20 सप्टेंबरला परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 23 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार राज्यसेवेचे पूर्व परीक्षा 5 एप्रिल 2020 रोजी घेण्यात येणार होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
मुंबई : कोरोना महामारीमुळे राज्यसेवेची पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर ऐवजी 20 सप्टेंबरला घेण्यात येणार आहे. 13 सप्टेंबरला NEET परीक्षा देशभरात होत असल्याने दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेण्यास उपकेंद्रांची उपलब्द्धता व इतर प्रशाकासकीय अडचणीमुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता 20 सप्टेंबर रोजी होईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 23 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार राज्यसेवेचे पूर्व परीक्षा 5 एप्रिल 2020 रोजी घेण्यात येणार होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 17 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार परीक्षा 13 सप्टेंबरला घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) 13 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
एपीएससीकडून आयोजित करण्यात आलेली परीक्षा आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेकरता प्रवेश देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने परीक्षा उपकेंद्रांची कमतरता निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.
ही अडचण लक्षात घेत राज्य पातळीवर घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर ऐवजी 20 सप्टेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या