एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
आदिवासी तरुणाचा राष्ट्रीय धावपटू ते नायब तहसीलदार पर्यंतचा संघर्षमय प्रवास
आई-वडील मोलमजुरी करणारे, डोक्यावर छप्पर नाही, अशा हलाखीच्या परिस्थितीत नाशिक येथील एक आदिवासी तरुण नायब तहसीलदार झाला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय धावपटू ते नायब तहसीलदार, असा त्याचा संघर्षमय प्रवास आहे.
नाशिक : अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नाशिकचा दत्ता हरिभाऊ बोरसे हा नायब तहसीलदार झाला आहे. आई-वडील मोलमजुरी करणारे, डोक्यावर व्यवस्थित छप्पर नाही. अशाही परिस्थितीत चिकाटीने शिकत दत्ता बोससे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. राष्ट्रीय धावपटू ते नायब तहसीलदार अशी प्रेरणादायी कहाणी दत्ता बोरसे याची आहे.
दत्ता बोरसे सध्या नाशिकच्या गोविंदनगर परिसरातील एका सोसायटीच्या आवारातील पत्राच्या घरात राहतो. ऊन्ह्यातळ उन्हाचा तडाखा अन् पावसाळ्यात गळके पत्रे. ज्या झाडाखाली आपली झोपडी बांधली तेवढाच काय तो आधार. माणसं राहतात म्हणून हे घर अन्यथा अडगळीच साहित्य ठेवण्याची पत्र्याची जागा. मात्र, ही झोपडी आता नायब तहसीलदारचं घर म्हणून ओळखली जाऊ लगाली आहे. गेल्या दोनचार दिवसात दत्ता बोरसेवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. त्याचा शोध घेत लोक त्याच्या घरी येतात आणि सारेच अवाकं होत आहेत.
मराठा आरक्षणामुळे मराठा समाजातील 127 तरुण झाले अधिकारी
दत्ता बोरसे याचं खेळातंही प्राविण्य
दत्ता बोरसे याने प्राथमिक शिक्षण नाशिक महपालिकेच्या शाळेत केले. त्यांतर महाविद्यालयीन शिक्षण भोसले मिलिटरी स्कूलमधून केले. या काळात त्याच्यातील खेळाडू बहरत गेला. त्याने अंतर महविद्यालयीन, अंतर विद्यापीठ स्पर्धा गाजवल्या. स्वतःचेच रेकॉर्ड मोडीत काढले. कांस्य, रौप्य, सुवर्ण अशी सर्वच पदकं पटकावलीत. सुवर्ण कामगिरी करणाऱ्या दत्ताचं घर एवढं छोट की घरात पारितोषिकं ठेवण्यासाठी जागा नाही. सराव करताना त्याच्या दोन्ही पायांना इजा झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर त्याने आश्रमशाळांमध्ये क्रीडा शिक्षकाची नोकरी केली. मात्र, आश्रमशाळांची अवस्था बघून त्याचे तिथे मन रमले नाही. त्यानंतर पुन्हा दुसरीकडे शोध सुरू झाला. मंत्रालयात लिपिक पदासाठी अर्ज देखिल केला. पण त्याहीपेक्षा चांगल्या पदावर काम करण्याची ईच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. सलग दोन तीन वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. एमपीएसी परीक्षा दिली. तीन वर्षांची महेनत, चिकाटीनंतर नायब तहसीलदार झाला.
आई-वडिलांच्या कष्टाचं चीज
दत्ता बोरस याचे आई-वडील हरसूल सारख्या दुर्गम आदिवासी पाड्यावरुन रोजगाराच्या शोधत नाशिकला आले. आईने लोकांची धुनी-भांडी केली. बांधकाम साईटवर बिगारी काम केले, तर वडील ही सुरुवातीला बिगारी काम आणि आता गेल्या काही वर्षांपासून एका सोसायटीत सुरक्षा रक्षकाचं काम करत आहेत. त्याच सोसायटीत बांधकाम व्यवसायिकांनी छोटीशी झोपडी बांधलायला परवानगी दिली. पै-पै गोळा करत मुलांना शिकवलं, मुलानं संधीच सोनं केल्यानं आई-वडिलांना आनंद समाधान लपवता येत नाही. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळत आहेत. नायब तहसीलदार या पदावरचं समाधानी न राहता याही पदापेक्षा मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न दत्ता बोरसेने उराशी बाळगलंय.
MPSC | सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर शिंदे बंधूंना यश, एक उपजिल्हाधिकारी, दुसरा नायब तहसीलदार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement