एक्स्प्लोर

Raj Thackeray: मनसेच्या वर्धापन दिनासाठी आखली विशेष योजना; राज ठाकरेंनी शेअर केली पोस्ट, म्हणाले, 'रायगडावर महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून...'

Raj Thackeray: तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या, असंही राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

MNS Vardhapan Din: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन उद्या ९ मार्च रोजी साजरा होणार आहे. पण यंदाचा वर्धापनदिन हा मनसैनिकांसाठी खास असणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या पायथ्याशी हा मनसेचा वर्धापणदिन सोहळा साजरा केला जाणार आहे. यासाठी खास योजना पक्ष प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आखल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या खास दिवसासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पोस्ट शेअर केली आहे. 

राज ठाकरेंची सोशल मिडीया पोस्ट

पोस्टमध्ये राज ठाकरेंनी (Raj Thackeray)  म्हटलंय की, "माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र, आपल्या पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २० वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत आहे. उद्या ९ मार्चला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे. या रायगडाने महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच पण 'शिवराज्याभिषेकाचा' साक्षीदार देखील हा किल्लाच.अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरु करत आहोत."

"आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या. तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्याला, आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे. तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या. सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात पण करणार आहोत ज्याचा तपशील तुम्हाला १० मार्चला कळलेच, फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत , उदा . मार्केट, शाळा , मंदिरं , कॅालेज , मैदानं , बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी आपली सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत ! येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपलंस करत ही सभासद नोंदणी करा. यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ती आपले सर्व पदाधिकारी तसेच शहर अध्यक्ष, उप शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष , सरचिटणीस आणि पक्षाच्या नेत्यांना कळवा ! तसे आदेश मी त्यांना दिले आहेत!".

"प्रश्न आकड्याचा नाहीये, तशीही आपली सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हे देखील स्पष्ट होईल ! त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करा. 
तुम्हाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. बाकी १९ मार्चला गुढी पाडव्याला शिवतीर्थावर आपली भेट होईलच , आणि तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून याल त्यामुळे मला तुमच्या रूपात महाराष्ट्र दर्शन देखील घडेलंच ! स्वतःची तसेच आपल्या परिवाराची आणि महाराष्ट्राची काळजी घ्या ! 
धन्यवाद ! 
आपला नम्र 
राज ठाकरे".

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
Rohit Pawar : भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल प्रशांत किशोर यांचं मनःपूर्वक अभिनंदन!, रोहित पवार यांची सूचक पोस्ट
भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल प्रशांत किशोर यांचं मनःपूर्वक अभिनंदन!, रोहित पवार यांची सूचक पोस्ट
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Parbhani : परभणी जिल्हा बँकेत 14 वर्षांनंतर बोर्डीकरांची एंट्री; इतिहासात पहिल्यांदाच बँक भाजपच्या ताब्यात
परभणी जिल्हा बँकेत 14 वर्षांनंतर बोर्डीकरांची एंट्री; इतिहासात पहिल्यांदाच बँक भाजपच्या ताब्यात

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget