एक्स्प्लोर
नगर जिल्ह्यात मुलीचा विनयभंग, आरोपीला बेड्या
अहमदनगरः अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी पेडगावमधून घरी जाताना दुचाकिस्वाराने पाठलाग करुन छेडछाड करत अश्लील चाळे केले. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी कॉलेजमधून घरी जात असताना अविनाश दिवटे या तरुणाने दुचाकीवरुन पाठलाग केला. रस्त्यात निर्जनस्थळी अडवून तिच्याशी अश्लिल चाळे केले. आवडत असल्याचं सांगत हाताला धरुन जबरदस्तीचा प्रयत्न केला.
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अविनाश दिवटे विरोधात विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवटेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार प्रकरण ताजं असतानाच श्रीगोंद्यात हा प्रकार घडल्यानं मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement