एक्स्प्लोर
Advertisement
तटकरे कुटुंबाला धक्का, आमदार अवधूत तटकरे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अवधूत तटकरे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अवधूत तटकरे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसण्याची मालिका सुरुच आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते एकामागोमाग एक शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांमध्ये आता तटकरे कुटुंबातील सदस्याचच समावेश आहे. खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आमदार अवधून तटकरे शिवसेनेच्या वाटेवर आहेत.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अवधूत तटकरे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहे. अवधूत तटकरे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे याआधीही अवधूत यांनी 'मातोश्री'वर जाऊनशिवसेनाप्रमुखांची भेट घेतली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असतानाच तटकरे कुटुंबीयांसाठी हा मोठा राजकीय धक्का असेल.
कोण आहेत अवधूत तटकरे?
- आमदार अवधूत तटकरे, हे तटकरे कुटुंबातील एक बडे प्रस्थ आहेत.
- रोह्याचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान आमदार, प्रशासन आणि पक्षात दबदबा असणारे आक्रमक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख
- यामुळे एकेकाळी सुनील तटकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून अवधूत ओळखले जात होते.
- त्यांची आक्रमकता आणि राजकीय महत्त्वाकांक्षा हा सुनील तटकरे यांच्यासाठी कायमच अडचणीची ठरली.
- सुनील तटकरे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यानंतर आमदारकी आपल्यालाच मिळाली पाहिजे, असा दावा करत अवधूत यांनी काकांनाच आव्हान दिले.
- तेव्हापासूनच तटकरे कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाल्याचे बोलले जाते
अवधूत आणि सुनील तटकरेंमधील वाद काय आहे?
अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे यांचे संबंध तणावाचे असल्याचं बोललं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः तटकरे कुटुंबीयांच्या या भांडणात हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण याला फार यश आलं नाही. 2016 ला अवधूत तटकरेंच्या छोट्या भावाने शिवसेनेत प्रवेश केला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अवधूत यांनी स्वतःची तयारी सुरु केली असल्याचं बोललं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement