एक्स्प्लोर
Advertisement
कसाबच्या फाशीबाबत बायकोलाही सांगितलं नव्हतं : शिंदे
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 26/11 मुंबईवरील हल्ल्याचा दोषी अजमल कसाबच्या फाशीबाबत पाळलेल्या गुप्ततेचा खुलासा केला. पंचाहत्तरीच्या निमित्ताने सुशीलकुमार शिंदे यांनी 'माझा कट्टा'वर दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला.
कसाबला फाशी देण्याच्या 15 दिवस आधी छत्तीसगड पोलिसांच्या गाडीवर हल्ला झाला होता, तशी घटना महाराष्ट्रच्या बाबतीत होऊ नये. मुंबईहून पुण्याकडे जाताना जे बोगदे लागतात, त्या बोगद्यावर चढून कोणी कसाबच्या गाडीवर बॉम्ब फेकेल, याची सर्वात जास्त भीती होती, त्यामुळेच सुरक्षेची सर्वती खबरदारी एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखून घेतली होती. छत्तीसगडप्रमाणे कसाबला नेताना झालं असतं तर राज्याची नाचक्की झाली असती. यासाठीच कसाबच्या फाशीवेळी अतिशय गुप्तता बाळगली होती, असं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं.
कसाबला फाशी दिली जाणार आहे हे मी माझ्या बायकोलाही सांगितलं नव्हतं. ज्या दिवशी फाशी पक्की झाली, त्याच्या एक दिवस अगोदर, मुंबईच्या आर्थर रोड जेलमधून पुण्याच्या येरवडा जेलकडे एक गाडी रवाना केली. त्यातून कसाब गेला असं सांगितलं. मात्र तो कसाब नव्हता. मग दुसऱ्या दिवशीही तशीच एक गाडी पाठवली, त्यातूनही कसाबला पाठवलं नव्हतं. मग रात्री साडेअकराच्या सुमारास प्रचंड सुरक्षेच्या लवाजम्यासह कसाबला येरवड्याला पाठवला. मग तिथेच त्याला फाशी दिली, असं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं.
कट्ट्यातील महत्त्वाचे मुद्दे
#माझाकट्टा : टीव्हीवरील #माझाकट्टा कौतुकास्पद आहे, मी त्याचं मनापासून स्वागत करतो : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : मुलींना सांभाळण्याचं काम करायचो, त्यामुळे नाईट हायस्कूल करता आलं : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : मी रस्त्यावर बुढ्ढी के बाल विकले, चपरासी होतो, त्यामुळे तरुणांनी कोणत्याही कामाला लाजू नका : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : सोनिया गांधीनी मला खूप काही दिलं, मुख्यमंत्री बनवलं : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : 'वर्षा' बंगला सोडल्यावर त्याची किल्ली माझा मित्र विलासराव देशमुखांकडे दिली : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : दलित मुख्यमंत्री समाजाच्या कल्याणासाठी निर्णय घेतो, राज्य व्यवस्थित सांभाळतो : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : राजकारणात मान-अपमान स्वीकारण्याची तयारी असावी लागते : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : त्याग करायला मला आवडतं आणि त्यातूनच मला बरंच मिळालं : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : शरद पवार फार हुशार आहेत : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : विरोधक कमी पडत नाहीत, सत्तेत असल्याने काँग्रेसला आक्रमकपणे बोलता येत नाही : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : काँग्रेस पक्ष हळूहळू आक्रमक होत आहे : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : आधी नारायण राणे विरोधी पक्षात होते, त्यावेळी राणे आणि मुंडेंना आम्ही खेळवत होतो : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : प्रेमा तुझा रंग, वेगळं व्हायचंय मला नाटकात काम केलं होत : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : तू राज कपूरसारखा दिसतोस असं अनेकांनी सांगितलं होतं : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : केंद्र सरकार काश्मीरप्रश्न अतिशय वाईट पद्धतीने हाताळत आहे: सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा:केंद्रीय गृहमंत्री असताना मी काश्मीरमध्ये जाऊन पाहणीही केली होती:सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : आम्ही त्यावेळी पोलिस, लष्करला अलर्ट केलं होतं: सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : 50वा दिवशीही काश्मीरमध्ये कर्फ्यू आहे, मनमोहन सरकारच्या काळात असं नव्हतं: सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा :सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपतींच्या आदेशाचं पालन करुन अफजल गुरुला फाशी : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : कसाबला फाशी देण्याच्या 15 दिवस आधी छत्तीसगड पोलिसांच्या गाडीवर हल्ला झाला होता, तशी घटना महाराष्ट्रच्या बाबतीत होऊ नये, यासाठी कसाबच्या फाशीवेळी अतिशय गुप्तता बाळगली होती : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : कसाबच्या फाशीबाबत माझ्या पत्नीलाही सांगितलं नव्हतं : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : ऊर्जामंत्री असताना एका वर्षात 15 हजार मेगवॅट वीजेची निर्मिती केली : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : गांधी घराण्याचं कौतुक करणं माझं कर्तव्यच आहे: सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : गांधी घराण्याने केलेली मेहरबाणी विसरणार नाही : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : पृथ्वीराज चव्हाणांनी थेट फोनवरुन सांगितलं असतं तर कदाचित कारवाई झाली असता: सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : राहुल गांधी काँग्रेसच नाही तर देशाचं नेतृत्त्व अतिशय उत्तमरित्या करतील : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : राहुल गांधी अतिशय हुशार आणि रणनीतीकार आहेत : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : राहुल गांधी काँग्रेस पक्ष चालवायला हवा : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : प्रियांका गांधी सध्या काँग्रेस अध्यक्ष होऊ शकत नाहीत : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : प्रणितीला तिकीट देण्याच्या मी विरोधात होतो : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : प्रणिती फार हुशार आहे, मात्र घरात दररोज राजकारणाचा विषय नसतो: सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : प्रणितीवर लग्नासाठी दबाव नाही, मात्र कोणत्याही जातीत लग्न करण्याची मुभा : सुशीलकुमार
#माझाकट्टा : झेड प्लस दर्जाची सुरक्षा नाही ते बरंच आहे : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : अॅट्रॉसिटी कायदा रद्द करु नये, मात्र तो योग्य पद्धतीने हाताळला पाहिजे : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : एवढं मिळालंय, राष्ट्रपतीपदाची इच्छा नाही : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : प्रत्येक राजकीय नेत्यांना कुठे राजकारण थांबावं, हे स्वत:च ठरवावं : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा : आंतरजातीय विवाह यशस्वी व्हावेत असं मला वाटतं : सुशीलकुमार शिंदे
#माझाकट्टा: नागराज मंजुळेचं कौतुक करतो, सैराट अतिशय सुरेख चित्रपट : सुशीलकुमार शिंदे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement