(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray: ठाकरेंचे प्रमुख नेते करणार महाराष्ट्र दौरा करणार, ठाकरेंची पुढची रणनीती ठरली?
शिंदे गट आता हळूहळू संपूर्ण शिवसेना काबीज करणार तेवढ्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढची रणनीती आखली आहे.
मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षातील वाद हा थांबता थांबत नाही. निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्षाचा चिन्ह व नाव हे शिंदे गटाला दिल्यानंतर आता ठाकरे गटाची मोठी कोंडी झाली आहे. शिंदे गट आता हळूहळू संपूर्ण शिवसेना काबीज करणार तेवढ्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढची रणनीती आखली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निकाल दिला. त्यानंतर मात्र, राज्यात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. शिवसेना आणि धनुष्यबाण गमावल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष ॲक्शन मोडवर आले आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे राज्यातील आपल्या जिल्हा अध्यक्षांची, पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची महत्वाची बैठक बोलावली या बैठकीमध्ये आपली रणनीती ठरवली आहे.
काय आहे ठाकरे गटाची पुढील रणनीती ?
- पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता ठाकरे गटाच्या वतीनं शिवसंपर्क अभियान आणि शाखा संपर्क अभियान सुरु करणार
- चिन्ह आणि पक्षाचे नाव लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहचणार
- पक्षातील पडझड थांबवण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार
- पक्षातील गळती थांबवण्यासाठी प्रयत्न करणार
- सामना, मार्मिक,सेना भवन, शिवालाय आणि जिल्हा जिल्ह्यातील कार्यालय आपल्या ताब्यात राहावे हे पाहण्याच्या सूचना
- ठाकरेंचे प्रमुख नेते करणार महाराष्ट्र दौरा करणार
- गाव,तालुका, जिल्हा पिंजुन काढायचे उद्धव ठाकरेंचे नेत्यांना आदेश
- आधी नेते करणार दौरा त्यानंतर उद्धव आणि आदित्य ठाकरे दौऱ्यावर जाऊन लोकांशी संवाद साधणार
- पक्षाची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांवर जबाबदारी
- वादात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर कायद्याने लढण्याचा निर्धार
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेना भवनात जिल्हा प्रमुख, संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रुख आणि विभागप्रमुखांची पुढील रणनीतीसाठी महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्वांमध्ये ऊर्जा भरली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले लोक मोठ्या ताकतीने प्रयत्न करणार असल्याचं ते सांगतात
सुरुवातीला पक्षात पडलेली फुट , यानंतर पक्षाच गेलेलं नाव आणि चिन्ह... यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळे आहे ते सावरण्यासाठी आता उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट कामाला लागला आहे. त्याला आता किती यश मिळतं हे पुढील काळात पाहणं महत्त्वाचं ठरेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या :