एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Aurangabad Crime: मेहुणीला ब्लॅकमेल करून नग्न व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडणारा अटकेत

Aurangabad : आरोपीला 14  नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शाहिद साजीदुज्जूमाँ यांनी दिले आहे. 

Aurangabad Crime News: औरंगाबादमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, मेहुणीला ब्लॅकमेल (Blackmailing) करून नग्न व्हिडीओ कॉल (Video Call) करण्यास भाग पाडून त्याचे स्क्रीन शॉट व्हायरल केल्याप्रकरणात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणात 21 वर्षीय पीडितेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला 14  नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शाहिद साजीदुज्जूमाँ यांनी दिले आहे. 

पिडीत महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेच्या लग्नाआधी दोन वर्षांपूर्वी सुट्यांमध्ये आरोपीचा नऊ वर्षांचा मुलगा पीडितेच्या घरी आलेला होता. तेव्हा त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी आरोपीने अॅन्ड्रॉईड मोबाइल दिला होता. त्या मोबाइलवरूनच आरोपी पीडितेशी बोलायचा. त्यांच्यात बोलणे सुरू असतानाच आरोपीने 'तुझ्या बहिणीला शारीरिक समस्या आहेत. तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवता येत नाहीत. आता तूच माझ्याशी लग्न कर, अन्यथा मी फाशी घेईन. मग तुझ्या बहिणीची मुले उघड्यावर येतील,' असे बोलून तिला भावनिक केले. 

व्हिडीओ कॉल करून नग्न होण्यास भाग पाडले...

आरोपीने लग्न करण्याची मागणी केली असता पीडिताने लग्नाला नकार देत, माझ्या बहिणीचा संसार बरबाद होईल, तू सांगशील तसे मी करेल' असे म्हणाली. त्यानंतर आरोपीने व्हिडीओ कॉल करून तिला नग्न होण्यास भाग पाडले. त्या व्हिडीओ कॉलचे त्याने स्क्रीन शॉट काढून ठेवले. दरम्यान, पीडितेचे लग्न झाले. मात्र एप्रिल 2022  मध्ये आरोपीने तिच्या अश्लील फोटोंचा आणि व्हिडीओ कॉलच्या स्क्रीन शॉटचा एक व्हिडीओ बनविला आणि तो नातेवाइकांना पाठविला. 

अखेर पोलिसात गुन्हा दाखल 

अश्लील फोटोंचा आणि व्हिडीओ कॉलच्या स्क्रीन शॉटचा एक व्हिडीओबाबत पीडितेला माहिती मिळाल्यावर ती काही दिवस शांत राहिली. दरम्यान, 16 सप्टेंबरला आरोपीने पुन्हा त्याचा मित्र आणि पीडितेच्या आतेभावाला व्हिडीओ पाठविले. त्यामुळे अखेर पिडीत महिलेने याप्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने 14 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. 

काय सांगता! चक्क मोबाईल टॉवरच चोरीला, औरंगाबादेतील अजब चोरीची गजब कहाणी

बकऱ्याच्या गोठ्यात नेऊन बळजबरीने बलात्कार 

दुसऱ्या एका घटनेत अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात 26 वर्षीय महिलेवर गावातीलच व्यक्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पिडीत महिलेला तिच्या पती आणि मुलास जीवे मारण्याची धमकी दिली. तर महिलेच्या असहायतेचा फायदा घेत गावाच्या बाहेरील पांधीरस्त्यावर असलेल्या बकऱ्याच्या गोठ्यात नेऊन बळजबरीने बलात्कार केला. तर पिडीत महिलेच्या फिर्यादीनुसार अजिंठा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bangladesh :बांग्लादेशात अल्पसंख्य हिंदूविरोधी हिंसा सुरूच, इस्कॉनच्या Chinmoy Krishna Das यांना अटकSpecial report : Thackeray Brother : राजकीय अपरिहार्यता ठाकरे बंधूंना जवळ आणू शकेल? #abpमाझाSpecial Report : Shahajibapu Patil : गुवाहाटीत नव्हे, आता सांगोल्यातही काय झाडी, काय डोंगार!ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 29 November 2024  दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
Embed widget