एक्स्प्लोर

नांदेडच्या शेतकऱ्याचा नाद खुळा, 35 हजारात तयार केली Electric Bike 

Maharashtra Nanded Farmer Electric Bikes : अनेकदा म्हटलं जातं, की गरज ही शोधाची जननी आहे. किंबहुना याचा प्रत्यय देणारी उदाहरणंही आपल्या डोळ्यांसमोर आहेत.

Maharashtra Nanded Farmer Electric Bikes : अनेकदा म्हटलं जातं, की गरज ही शोधाची जननी आहे. किंबहुना याचा प्रत्यय देणारी उदाहरणंही आपल्या डोळ्यांसमोर आहेत. यातच आता आणखी एका उदाहरणाची भर पडली आहे. पेट्रोल महाग झाल्याने वाहन चालवणं परवडत नसल्यामुळे नांदेडमधील एका शेतकऱ्याने जुन्या दुचाकीपासून इलेक्ट्रिक बाईक तयार केली आहे. या गाडीची नांदेड आणि परिसरता चर्चा सुरु आहे. अनेक कंपन्यांनी महागड्या इलेक्ट्रिक स्कुटी बनवल्या आहेत परंतु कमी पैसे खर्च करून सुनिल घरत यांनी बनवली इलेक्ट्रिक बाईक बनवली आहे . 

नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील महादेव पिंपळगाव  येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर उमाजीराव कल्याणकर याने इलेक्ट्रिक बाईक तयार केली आहे. ज्ञानेश्वरने दोन वर्षांच्या अथक प्रयत्नाने चार्जिंगवर चालणारी मोटारसायकल तयार केली आहे. इंधन दरवाढीच्या कटकटीला कायमचा रामराम करण्यासाठी या अवलियाने चक्क इलेक्ट्रॉनिक बाईक बनवलीय. पेट्रोलच्या किमतीत सतत होणार्‍या दरवाढीचा फटका प्रत्येकाला बसत आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री बसून त्याची आर्थिक घडी विस्कटलीय. 

ज्ञानेश्वर हा पाच एकर जमीन असणारा अल्पभूधारक शेतकरी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची आवड व आस असणारा ज्ञानेश्वर हा फक्त दहावी शिकलेला आहे. शेतीला आधुनिकतेची जोड देत व लहरी हवामानामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान पाहून तो फुल शेतीकडे वळाला.  ज्ञानेश्वर शेतातील फुले सकाळी मोटारसायकलवर नांदेडच्या बाजार पेठेत घेऊन जातो. दरम्यान नियमित दळणवळण करण्यासाठी त्याला 150 रुपये खर्च येत होता. त्यामुळे फुल शेतीतून दळणवळणाचा खर्च निघत नसल्याने त्रस्त झाला होता. ज्ञानेश्वरने पेट्रोलवर होणार्‍या खर्चावर उपाय आपल्या ग्रामीण जुगाडातून इलेक्ट्रॉनिक बाईकची निर्मिती केलीय. जुन्या मोटारसायकलवर सतत दोन वर्षे प्रयोग केल्यानंतर ज्ञानेश्वरला यश मिळाले आहे.

केवळ अर्ध्या तासात चार्जिंगवर चालणारी व तीन युनिट मध्ये चार्ज होणाऱ्या या मोटारसायकलला फक्त 14 रुपयांची वीज लागते. तर एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 100 कि.मी अंतर पार करते, हेच अंतर पट्रोलने पार केल्यास 250 रु खर्च येतो. सदरील मोटर सायकल बनवण्यासाठी 35 ते 40 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. तर याच मोटारसाकलला 2000 व्हॅटची बॅटरी बसवल्यास फसलेले ट्रॅक्टर सुध्दा काढता येईल असा विश्वासही ज्ञानेश्वरने बोलून दाखवलाय. त्यामुळे पुढील काळात या चार्जिंग मोटारसायकलवर आणखी संशोधन करण्याचा ज्ञानेश्वरचा माणस आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
Mumbai Crime: अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा करत खुणावलं, नागरिकांनी रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली
अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा केला, रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली, गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case: कोयता, 41 इंचाचा रॉड, फायटर अन्... संतोष देशमुखांच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम
रॉड, फायटरने बेदम मारुनही संतोष देशमुखांचा जीव जात नव्हता, हैवान आरोपींनी छातीवर उड्या मारल्या
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुंबईत CM फडणवीसांच्या भेटीला, काय चर्चा होणार? राज्याचं लक्ष
मोठी बातमी : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुंबईत CM फडणवीसांच्या भेटीला, काय चर्चा होणार? राज्याचं लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 07 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सNagpur HMPV Virus Cases : नागपूरमध्ये दोन मुलांना एचएमपीव्हीची लागण, घरी उपचार घेऊन दोघे बरे झालेABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 07 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTulja Bhavani Mandir Temple : तुळजाभवानीच्या गाभाऱ्याला पुरातन झळाळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
Mumbai Crime: अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा करत खुणावलं, नागरिकांनी रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली
अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा केला, रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली, गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case: कोयता, 41 इंचाचा रॉड, फायटर अन्... संतोष देशमुखांच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम
रॉड, फायटरने बेदम मारुनही संतोष देशमुखांचा जीव जात नव्हता, हैवान आरोपींनी छातीवर उड्या मारल्या
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुंबईत CM फडणवीसांच्या भेटीला, काय चर्चा होणार? राज्याचं लक्ष
मोठी बातमी : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुंबईत CM फडणवीसांच्या भेटीला, काय चर्चा होणार? राज्याचं लक्ष
Sam Konstas Salary : विराटशी पंगा घेणाऱ्या 19 वर्षीच्या पोरांचा पगार कोटींनी वाढला! एका सामन्यासाठी घेणार इतके पैसे? वाचून थक्क व्हाल!
विराटशी पंगा घेणाऱ्या 19 वर्षीच्या पोरांचा पगार कोटींनी वाढला! एका सामन्यासाठी घेणार इतके पैसे? वाचून थक्क व्हाल!
मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला
युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला
Embed widget