एक्स्प्लोर

Maharashtra Rain Update | मुंबईत येत्या आठ तारखेपासून बेस्ट बस सेवा पूर्ववत होणार

Maharashtra Rain LIVE UPDATE : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर काल ‘निसर्ग’ चक्रीवादळाचं संकट आलेलं. या वादळाचा धोका कमी झाला असला तरी आता राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पावसासंबंधी प्रत्येक माहिती आणि अपडेटसाठी कनेक्ट राहा...

LIVE

Maharashtra Rain Update | मुंबईत येत्या आठ तारखेपासून बेस्ट बस सेवा पूर्ववत होणार

Background

मुंबई : राज्यात काल 'निसर्गा'चाच दिवस असल्याचे पाहायला मिळाले. कारण, कोकण किनारपट्टीवर आज निसर्ग नावाच्या चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. तर, राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम आज देखील राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे. काल पावसासोबत सोसाट्याचा वाराही सुरु असल्याने अनेक ठिकाणी मोठ्या संपत्तीचे नुकसान झालं आहे. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले. जोरदार वाऱ्याने झाडे उन्मळून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत.

निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकले असून मोठ्या प्रमाणात वारा सुटला आहे. रायगडमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकल्यानंतर मुंबईतही वाऱ्याचा वेग वाढू लागला आहे. तिकडे राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मान्सूनपूर्व पावसाने सलग चौथ्या दिवशी जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई महाराष्ट्रावरील निसर्ग चक्री वादळाचं संकट टळलं असलं तरी अजूनही पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहत आहे.आज सकाळपासूनच मुंबईवर काळे ढग दिसत आहेत. तसेच हवा सुद्धा जोरात आहे. मुंबई उपनगरात साडेनऊ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस बरसायला सुरुवात झाली. यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे .कुर्ला चेंबूर,घाटकोपर, विक्रोळी , मुलुंड सर्वच भागात हा पाऊस सुरू आहे.

Nisarga | 'निसर्गा'चा तडाखा, अनेक ठिकाणी उन्मळले वृक्ष, घरांची पडझड, पुण्यात दोघांचा मृत्यू

 ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला जबरदस्त तडाखा दिल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर अनेक ठिकाणी मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी वादळाने पोल देखील पडले आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, नवी मुंबई, कल्याण, ईगतपुरी,नाशिक जिल्ह्यातील वीजयंत्रणेला मोठा फटका बसला आहे. महावितरणची संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कामाला लागली असून सर्वप्रथम उपकेंद्रांचा वीजपुवठा सुरु केला जाईल व तेथून पुढे टप्प्या-टप्प्याने 11 केव्ही व लघुदाब वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा लागणार आहे.

17:41 PM (IST)  •  05 Jun 2020

शिर्डी परिसरात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. कोपरगाव, राहाता तालुक्यातही मुसळधार पाऊस. कोपरगावात अनेक व्यापारी संकुलात पाणी भरले. दोन तासापासून मुसळधार पाऊस.
21:13 PM (IST)  •  04 Jun 2020

पालघर जिल्ह्यात सातपाटी भागात जोरदार पावसाने शॉर्ट सर्किट होऊन रोहित्राला आग. 25 हजार लोकसंख्या असलेलं सातपाडी अंधारात.
16:16 PM (IST)  •  04 Jun 2020

निसर्ग चक्रीवादळचा परिणाम पुणे जिल्ह्यालाही जाणवला, जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात सर्वाधिक नुकसान या वादळामुळे झाले आहे. मुळशी तालुका हा कोकण भागाला अत्यंत जवळ आहे. ताम्हिणी घाट ओलांडल्यावर कोकण हद्द सुरु होते. त्यामुळे साहजिकच या भागात घाटमाथ्यावर वादळाचा परिणाम होऊन मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानेही वर्तवली होती. त्यानुसार काल दिवसभर वादळ पाऊस झाल्याने या तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे, अनेक घरांचे पत्रे उडून गेले, भिंती खचल्या, तर शेतामध्येही पाणी जाऊन मोठे नुकसान झाले आहे.
18:19 PM (IST)  •  06 Jun 2020

मुंबईत 8 जून पासून बेस्ट पूर्ववत होणार आहे. अत्यावश्यक सेवांसोबतच इतर नागरिकांसाठीही बेस्ट सुरु होणार आहे. राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन मधील तीन टप्प्यातील नियमावलीनुसार पुढील वर्गातील व्यक्ती बेस्टनं प्रवास करु शकणार आहे. 1. अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी (आधीही प्रवास करत होते) 2. सरकारी कार्यालयातील कर्मचारी 3. खाजगी कार्यालयातील कर्मचारी 4. दुकानदार 5. प्लंबर, इलेक्ट्रीशिअन अशा सुविधा देणाऱ्या कामगार वर्गाला प्रवास करता येणार आहे. एका सीट वर एक प्रवासी अशा रितीने 30 प्रवासी बेस्टमधून प्रवास करतील तर 5 प्रवाशांना उभं राहून प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.
11:45 AM (IST)  •  04 Jun 2020

मुंबईवरचं निसर्ग चक्रीवादळाचं संकट जरी टळलं तरी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही तासाच्या पावसाने मुंबापुरीची तुंबापुरी व्हायला सुरुवात झाली आहे. सायन परिसरात पाणी साचलं आहे.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget