Maharashtra Breaking News Live Updates : तानाजी सावंत यांच्या विजयावर राहुल मोटे यांना संशय, ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज
Maharashtra Election Results News Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

Background
मुंबई : विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) महायुतीला (Mahayut) घवघवीत यश मिळाल्यानंतर आता राज्यात नव्या सरकार स्थापनेसाठी हालचाली वाढल्या आहेत. महायुतीत नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीला वेग आला आहे. भाजपा आणि शिवसेना या पक्षांत मुख्यमंत्रिपदावर सध्या चर्चा होत आहे. सोबतच कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळावीत, याचाही फॉर्म्यूला निश्चित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 5 डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात सर्वदूर थंडीचा कडाका वाढला आहे. जागोजागो शेकोट्या पेटलेल्या दिसतायत. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
विधानसभेनंतर मनोज जरांगे पहिल्यांदा दौऱ्यावर, मराठा आरक्षण नवे मुख्यमंत्री, काय बोलणार?
धाराशिव ब्रेकिंग
विधानसभा निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पहिल्यांदा दौऱ्यावर
तुळजापुरात आई तुळजाभवानीचं दर्शन घेणार, त्यानंतर पंढरपूर येथे विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवणार
मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाची धाराशिव ते तुळजापूर असं बाईक रॅलीचं नियोजन
मराठा आरक्षण, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाचा तिढा यावर मनोज जरांगे काय बोलणार ?
धाराशिव च्या परांडा तालुक्यात बिबट्याचा वावर, पाळीव प्राण्यांवर हल्ले
धाराशिव च्या परांडा तालुक्यात बिबट्याचा वावर
बिबटयाकडून दुग्ध जनावरांवर हल्ला
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा























