एक्स्प्लोर

'महालक्ष्मी एक्सप्रेस ऑपरेशन' यशस्वी, पाच तासांत 9 गर्भवतींसह 1050 प्रवाशांची सुखरुप सुटका

बदलापूर परिसरात जोरदार पावसामुळे वांगणीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी स्थानकाजवळ अडकली. जवळपास 1050 प्रवासी यामध्ये अडकले होते.

कल्याण : बदलापूर परिसरात जोरदार पावसामुळे वांगणीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी स्थानकाजवळ अडकली. जवळपास 1050 प्रवासी यामध्ये अडकले होते. रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), कल्याण शहर पोलीस, राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाने या 1050 प्रवाशांची सुखरुप सुटका केली आहे. त्यामध्ये 9 गर्भवती महिलांचा समावेश आहे. सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांसाठी जवळच 17 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेसद्वारे प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं जाणार आहे. प्रवाशांना मदत आणि उपयोगी साहित्य पुरवण्यात आले आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकल्याने प्रवाशांचे हाल,बाळाच्या दुधासाठी आईची हाक | कल्याण | ABP Majha  सध्या या प्रवाशांना बदलापूर स्थानकावर पोहोचवले जात आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या बचाव कार्याबद्दल सांगितले की, 19 डबे असणारी विशेष ट्रेन महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना घेऊन कोल्हापूरला जाणार आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी 12 तासांनंतर NDRF दाखल | ABP Majha  बचाव कार्य सुरु असताना प्रशासनाने घटनास्थळी 37 डॉक्टर्स पाठवले होते. या डॉक्टरांनी बचाव कार्यानंतर सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी केली. दरम्यान, आरपीएफ आणि नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना बिस्किटं आणि पाणी दिले. महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांचं नेव्ही, एअर फोर्सकडून रेस्क्यू ऑपरेशन | ABP Majha  दरम्यान, महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये रेस्क्यू सुरु असतानाच गाडीत 9 गर्भवती महिला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर प्रशासनाने प्राधान्याने गर्भवती महिलांच्या रेस्क्यूला सुरुवात केली. संध्याकाळी चार वाजेपर्यंत गाडीत असलेल्या गर्भवती महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. 37 डॉक्टरांच्या मदतीनं या महिलांवर उपचार केले जात आहेत. सध्या सर्व महिलांची प्रकृती ठिक आहे. परंतु सकाळी एका महिलेला प्रसूतीकळा सुरु झाल्यानंतर महिलेचे हाल झाले. Central Railway Chief Public Relations Officer on #MahalaxmiExpress rescue operation: A special train with 19 coaches will leave from Kalyan to Kolhapur with the passengers of Mahalaxmi Express. #Maharashtra pic.twitter.com/lKFs8y54hc
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSaleel Kulkarni : सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सलील कुलकर्णींनं लेकासोबत बजावला मतदानाचा हक्क : ABP MajhaBeed Loksabha Pankaja Munde : बाबांची उर्जा आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे : पंकजा मुंडेParli Lok Sabha Dhananjay Munde : छोट्या बहिणीला मतदान करताना जो आनंद झालाय तो शब्दात मांडण अशक्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Savani Ravindra : मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Embed widget