एक्स्प्लोर

कोल्हापूर महापालिकेत मुका घ्या मुका! विरोधक नगरसेवकाने घेतली सत्ताधारी नगरसेवकाची पप्पी

कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात आज महापौर राजीनाम्याची विशेष सभा बोलवण्यात आली होती. या सभेवेळी भर सभागृहात विरोधी गटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याची पप्पी घेतल्यामुळे सर्वजण अवाक झाले.

कोल्हापूर : सतत वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेची सभा आज वेगळ्याच कारणामुळे गाजली. महापालिकेची सभा सुरु असतानाच भर सभागृहात विरोधी गटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याची पप्पी घेतल्यामुळे सर्वजण अवाक झाले.

महापालिकेच्या सभागृहात आज महापौर राजीनाम्याची विशेष सभा बोलवण्यात आली होती. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेत विरोधी गट असलेल्या ताराराणी आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे आज थेट सत्ताधारी गटाच्या बाकावर जाऊन बसले. त्यांच्या शेजारी काँग्रेसचे गटनेते आणि स्थायी समितीचे सभापती शारगंधर देशमुख बसले होते.

सभागृहाचे कामकाज सुरु झाले. त्यानंतर अभिनंदनाचे ठराव सुरु झाले. ते सुरु असतानाच भोपळे आणि देशमुख यांच्यात काहीतरी बोलणे झाले. आणि खुशीत असलेल्या कमलाकर भोपळे यांनी भर सभागृहात शारगंधर देशमुख यांची पप्पी घेतली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सर्व सभागृहात हशा पिकला.

म्हशीला कुत्रं चावल्यानं संपूर्ण गाव दवाखान्यात, कोल्हापूरातील अजब घटना

भोपळे आणि देशमुख यांच्यात नेमकी काय चर्चा सुरु होती? हे समजू शकलेले नाही. मात्र सभागृहात अशा वागण्यामुळे त्याची उलटसुलट चर्चा सुरु होती. कमलाकर भोपळे हे ताराराणी आघाडीचे नगरसेवक आहेत. मात्र आपल्याला भाजप आणि ताराराणी आघाडीचे नगरसेवक मान देत नाहीत. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यांना आपले काम आवडते. ते आपल्याला मान देतात. असेही भोपळे यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, सभागृहात अशा प्रकारचे वर्तन योग्य नसल्याचीही प्रतिक्रीया दबक्या आवाजात उमटली.

व्हिडीओ पाहा 

म्हशीला कुत्रा चावल्यानं संपूर्ण गाव दवाखान्यात! | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget