वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
State Electricity Board : वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
![वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ mahavitaran mahanirmiti mahapareshan govt increase wages da dearness allowance Maharashtra State Electricity Board वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/787adf0b07e9de6025c77030d4db976e172035836536993_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती उमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी याची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या तिन्ही वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात मध्ये 19 टक्के व सर्व भत्त्या मध्ये 25 टक्के वाढ देण्याचे मान्य केले आहे. तसेच सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा 500 रुपयांचा भत्ता 1000 रुपया इतका करण्यात आला आहे.
या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तिन्ही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)