Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
पापाचा घडा कोणाचा भरला हे उद्धव ठाकरेंना विधानसभेत दिसेल. महाविकास आघाडीच्या दोन अडीच वर्षाचा काम आणि आमचं दोन वर्षाचं काम याची जनता तुलना करेल, असेही सीएम शिंदे म्हणाले.
Eknath Shinde on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडल्याने लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलं. लोकसभा निवडणुकीत 13 जागा आम्ही लढलो आणि सात जागा जिंकल्या. च्यापेक्षा दोन लाख मत आम्ही जास्त घेतली. उद्धव ठाकरेंच्या सेनेचा 42 टक्के स्ट्राईक रेट होता, तर आमचा 47 टक्के स्ट्राईक रेट आहे. त्यामुळे आता रडणं बंद करा. लोकसभेत कशा जागा मिळाल्या कोणामुळे मिळाल्या मिळाल्या ते महाराष्ट्रातील जनतेला माहीत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
पापाचा घडा कोणाचा भरला हे उद्धव ठाकरेंना विधानसभेत दिसेल. महाविकास आघाडीच्या दोन अडीच वर्षाचा काम आणि आमचं दोन वर्षाचं काम याची जनता तुलना करेल. जनता काम करण्याच्या पाठीशी उभी राहील, असा दावा त्यांनी केला.
लहान बाळा सारखे कितीवेळा रडणार?
सीएम शिंदे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुम्हाला सहाव्या नंबरवर जनतेनं टाकलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला दुसऱ्या नंबरची मतं मिळालेली आहेत. लोकसभेमध्ये लोकांनी दाखवून दिलं. उद्धव ठाकरेंच्या पक्षापेक्षा आम्हाला जास्त मते मिळाली. आम्हाला 19 टक्के मते, तर ठाकरे यांना 14 टक्के मतं आम्हाला मिळाली. लोकांनी आता शिक्कामोर्तब केलं असल्याचे ते म्हणाले.
स्वतःच्या गेट बाहेर न येणारे शेताच्या बांधावर जाऊन भेटत आहेत
त्यांनी सांगितले की, शिवसेनेचा मूळ मतदार हा धनुष्यबाणासोबत आहे याची प्रचिती विधानसभेत येईल. बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही काय चुकी केली अभद्र युती केली याचा परिणाम विधानसभेत भोगावे लागेल. स्वतःच्या गेट बाहेर न येणारे शेताच्या बांधावर जाऊन भेटत आहेत याचा आनंद आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.
महिला भगिनींना लाडली बहीण योजनेअंतर्गत 18 हजार रुपये देत आहोत. आम्ही त्या लाडली पण योजनेतील अटी कमी केल्या. तीन सिलेंडर मोफत देत आहोत. भावाकडून बहिणीला भाऊबीज आणि रक्षाबंधन भेट आहे. ती दिलेली सन्मानाची भेट आहे. आमच्या सरकारची देण्याची दानत आहे. ही योजना कायमस्वरूपी मिळत राहील, असेही त्यांनी सांगितले. नियमित कर्ज भरणाऱ्यांना इन्सेंटिव्ह देण्याची घोषणा केली त्याचे पैसे आम्ही देत आहोत. त्यांच्या काळात विज बिल माफ करू म्हणून निवडणूक लढवल्या. नंतर प्रिंटिंग मिस्टेक आहे असं आम्ही करणार नाही, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांची वीज माफ केली आहे, कायमस्वरूपी राहील हे शेती पंप सोलरवर आम्ही कन्वर्ट करू. जे वीज बिल माफ केल आहे ते पर्मनंट राहील. जे गेटमधून आज कोणाला न घेणारे शेतावर पोहचले याचा आम्हाला आनंद आहे.
इतर महत्वाच्या बातम्या