Sambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन कसे पुढे जायला पाहिजे ही आज वेळ आली आहे विशाळगडाला खूप मोठा इतिहास आहे त्यामुळे मी विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला अतिक्रमण, पशु हत्या केली जाते हे ऐकून होतो पण दीड वर्षांपूर्वी मी विशाळगडावर गेलो गडावर गेल्यानंतर आणि सगळी दृश्य पाहिल्यावर मला खूप दुःख झालं मी तत्काळ जिल्हाधिकारी यांना भेटलो आणि जे अतिक्रमण झालं ते हटवण्याची मागणी केली अतिक्रमण दोन्ही बाजूने झालं आहे, आम्ही कुणाच्या धर्माच्या विरोधात नाही शिवाजी महाराज यांचा किल्ला असताना इथं मद्यपान केलं जातं कत्तलखाना बंद व्हावा अशी आम्ही मागणी केली महाशिवरात्रीच्या आधी सगळे अतिक्रमण काढू असं आश्वासन दिलं आणि काम चालू केलं पण तातडीने त्याला कोर्टात जाऊन स्थगिती देण्यात आली त्यामुळे अतिक्रमण काढणे बंद झाले आता शिवभक्त प्रश्न विचारू लागले राजे तुम्ही का भूमिका घेत नाही मला आनंद आहे की पुन्हा ही चळवळ सुरू झाली आहे कुणी अतिक्रमण केलं, कोणत्या गोष्टीचं अतिक्रमण केलं हे शासनाला माहिती आहे दोन्ही बाजूने झालेलं अतिक्रमण काढावे अशी माझी मागणी आहे दीड वर्षांपूर्वी स्थगिती आल्यानंतर सरकारने काय केलं याचं उत्तर सरकारला द्यावेच लागेल त्यामुळे आता गप्प बसून चालणार नाही, कुठंतरी भूमिका घेतलीच पाहिजे विशाळगडावरील अतिक्रमण काढणं हेच मोठं संकट आहे आता 13 जुलै रोजी माझ्यासकट सर्व शिवभक्त विशाळगड इथं जाणार आता शिवभक्तांना हे सरकार थांबवू शकत नाही जी स्थगिती आली त्यावर एकदाही वाद विवाद झाला नाही ही सरकारच्या कामाची पद्धत आहे त्यामुळे 13 तारखेला दुपारी 2 वाजता सर्व शिवभक्त विशाळगडावर जातील आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल पण आम्ही घाबरणार नाही शिवाजी महाराज यांनी सगळ्या गोष्टी सांगून केल्या नाही, पण आम्ही काही गनिमी कावा करणार नाही मला इतकंच माहिती आहे की अन्यायच्या विरोधात उभा राहायची भूमिका माझी आहे आमची एकच मागणी आहे की अतिक्रमण काढून टाकावे मुख्यमंत्री यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समोर राजसदरेवरून सांगितलं होतं की संभाजीराजे तुमच्या मनातील विशाळगड आहे तेच आमच्या मनात आहे आता आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या मनातील बघायचं आहे 13 जुलै चलो विशाळगड दुपारी 12 वाजता 1947 नंतर राजे वैगेरे कोण नाही नागरिक आम्हाला राजे म्हणतात हे ठीक आहे