एक्स्प्लोर
भाऊबीजेला पणती लावताना भाजलेल्या चिमुरडीचा मृत्यू
पणती लावताना पल्लवी भाजून गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

जळगाव : जळगावात ऐन दिवाळीतच एक पणती विझली. पणती लावताना भाजून गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी, भाऊबीजेच्या दिवशी पल्लवी चौधरी ही दहा वर्षांची बालिका पणती लावत होती. पणती लावताना पल्लवी भाजून गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारांदरम्यान पल्लवीला वाचवण्यात यश आलं नाही. जळगावातल्या आव्हाने गावात ही घटना घडली. ऐन दिवाळीत झालेल्या या अपघातामुळे चौधरी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
आणखी वाचा























